AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजीनगरचा महापौर निश्चित! या अभ्यासू नेत्याला लॉटरी, तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या या नेत्याला संधी

Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा महापौर अखेर ठरला. भाजपच्या या अभ्यासू नेत्याला लॉटरी लागल्याचे समजते. तर शिवसेनेच्या या चेहर्‍याला संधी दिल्याचे समोर येत आहे. आज या दोन्ही नावाची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे.

छत्रपती संभाजीनगरचा महापौर निश्चित! या अभ्यासू नेत्याला लॉटरी, तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या या नेत्याला संधी
छत्रपती संभाजीनगर महापौरImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Feb 06, 2026 | 1:01 PM
Share

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Mayor: छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा महापौर ठरला. तर उपमहापौर पदी शिवसेनेच्या नेत्याला संधी देण्यात आली आहे. या शहराचा 23 वा महापौर कोण होणार याची चर्चा होती. 57 जागा जिंकत भाजपने सर्वात मोठी झेप घेतली आहे. तर त्यापाठोपाठ 33 जागांसह AIMIM हा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका महापौर आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले. भाजपमध्ये अनेकजण महापौर पदासाठी इच्छुक होते. अनेकजण महापौर पदाच्या शर्यतीत होते. शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला. भाजपला बहुमतासाठी केवळ एका जागेची गरज आहे. 115 नगरसेवक असलेल्या या महापालिकेचा कारभार आता भाजप हाकणार आहे.

समीर राजूरकर भाजपचे महापौर

महापौर पदासाठी राजू वैद्य, समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी, सविता कुलकर्णी, माधुरी अदवंत, महेश माळवतकर, अनिल मकरिये, विजय औताडे, अप्पासाहेब हिवाळे, शिवाजी दांडगे, राज वानखेडे, रामेश्वर भादवे, अनिल मकरिये या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. पण ताज्या अपडेटनुसार, छत्रपती संभाजीनगरचे महापौर उपमहापौर ठरले आहेत. फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. समीर राजूरकर हे भाजपचे महापौर तर राजेंद्र जंजाळ हे शिवसेनेचे उपमहापौर असतील. समीर राजूरकर हे अभ्यासू आणि संयमी आणि भाजपच्या शिस्तीतील नेतृत्व मानल्या जाते. तर शिवसेनेकडून राजेंद्र महापौर यांना मोठी संधी देण्यात आली आहे.

लवकरच अधिकृत घोषणा

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर असेल, अशी अधिकृत माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि शिवसेनेचे पक्ष निरीक्षक विलास पारकर यांनी दिली. भाजपा आणि शिवसेना महापौर आणि उप महापौर यांच्या नावाची घोषणा काही तासाच्या आत करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सत्ता समीकरणात भाजपने जातीय संतूलन साधल्याचे मानले जाते. शहरात ब्राह्मण आणि मराठा समाजासह इतर सर्वच समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.

विरोधी नेता कोण?

AIMIM ने या महापालिकेत मोठी मुसंडी मारली. गेल्या वेळी एमआयएमचे 25 नगरसेवक निवडून आले होते. तर यावेळी 33 नगरसेवक निवडून आले आहे. एमआयएम विरोधी बाकड्यावर बसेल. आता एमआयएमचा चेहरा कोण असेल याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वी भाजपच्या कोअर कमिटीने महापौर पदाचे नाव प्रदेशाध्यक्षाकडं पाठवलं होतं. त्यांच्या अनुकूलतेनंतर आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा महापौर पदाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

Follow Us
दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या! पवारांचे खासदार आणि मोदींच्या भेटीआधीच
दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या! शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर