पाकिस्तानचा भारताबद्दल मोठा निर्णय, नांगा दबला, थेट पाकिस्तानी मंत्री..
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. पहलगामवरील हल्ल्यानंतर हे संबंध अधिक ताणली गेली. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येत आहे. पाकिस्तानला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतासोबत संबंध सुधारायची आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. त्यातच ऑपरेशन सिंदूरनंतर पुन्हा तणाव अधिक वाढला. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चांगलाच नरमल्याचे बघायला मिळतंय. पाकिस्तानने शनिवारी मोठी घोषणा केली. दिल्लीत 20 ते 22 नोव्हेंबर रोजी शंघाई सहयोग संघटनेच्या परिषदेत पाकिस्तान सहभागी होणार आहे. पाकिस्तानला भारतासोबत संबंध सुधारायची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 च्या तियानजिनमध्ये झालेल्या SCO शिखर संमेलनात संवाद वाढवण्याबद्दल प्रस्ताव ठेवला होता. 2023 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी SCO विदेश मंत्र्यांच्या बैठक सहभागी होण्यासाठी गोव्यात आले होते. पहलगामवरील हल्ल्यानंतर आता दोन्ही देशात पहिला मोठा दाैरा होणार आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने सांगितले की, जलवायु परिवर्तन आणि पर्यावरण समन्वयाच्या मुद्द्यात मंत्री मुसादिक मसूद मलिक पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करतील.
भारताने या परिषदेकरिता मंत्री आैरंगजेब खिची यांना आमंत्रित केले होते. पण या परिषदेत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व जलवायु परिवर्तन आणि पर्यावरण समन्वय मंत्री मुसादिक मसूद मलिक करतील. त्यांना पाकिस्तान सरकारमधील अनुभवी मंत्री मानले जाते. पाकिस्तानने आपल्या घोषणेत म्हटले की, हा कार्यक्रम SCO सदस्य देशांचा आहे. यात काही मुद्द्यावर चर्चा होईल.
इस्लामाबाद SCO च्या माध्यमातून सन्मान आणि संवादातून संबंध मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. 2023 मध्ये बिलावल दाैऱ्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचा दाैरा केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील मंत्र्यांमध्ये कोणताही दाैरा झाला नाही. आता पाकिस्तान पुन्हा आपल्या मंत्र्याला भारत दाैऱ्यावर पाठवत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही वर्षात कोणतीही व्दिपक्षीय चर्चा झालेली नाही. त्यातच पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील महत्वाचे मंत्री भारत दाैऱ्यावर येत आहेत. अनेक वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात राहिली आहेत. त्यातच आता भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने एक पाऊल पुढे टाकले. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध तणावात होती. आता ही संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे.
