AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवांचा राजेशाही थाटात साखरपुडा, 50 एकरमध्ये उभारले चार महालासारखे महामंडप, दीड लाख लोक जेवायला, 1000 कुक…

उत्तर प्रदेशातील अजून एक राजेशाही साखरपुडा चर्चेत आहे. अलिगड येथे या साखरपुड्यासाठी 50 एकरमध्ये चार महालासारखे महामंडप उभारण्यात आले होते. 1000 कुक आणि अनेक मदतनीस मदतीला होते.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवांचा राजेशाही थाटात साखरपुडा, 50 एकरमध्ये उभारले चार महालासारखे महामंडप, दीड लाख लोक जेवायला, 1000 कुक...
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवांचा राजेशाही साखरपुडा, दीड लाख लोक जेवायला, 1000 कुक
| Updated on: Nov 15, 2026 | 7:31 AM
Share

Kalyan Singh Grandsons Engagement: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे दोन नातू, राज्यमंत्री संदीप सिंह आणि त्यांचा लहान भाऊ सौरभ सिंह यांचा राजेशाही साखरपुडा थाटात झाला. त्यासाठी अलिगड येथे 50 एकरमध्ये चार महालासारखे महामंडप उभारण्यात आले होते. तर दीड लाख पाहुण्यांच्या जेवणासाठी 1,000 कूक आणि अनेक मदतनीस दिमतीला होते. सध्या उत्तर भारतातील शाहीविवाह देशभरात चर्चेत आहेत. त्यात या साखरपुड्याची भर पडली आहे.

महालासारखे चार महामंडप उभारले

माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नातू आणि उत्तर प्रदेश सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री संदीप सिंह यांचा साखरपुडा मेघना चौधरी यांच्यासोबत झाला. तर त्यांचे लहान भाऊ सौरभ सिंह यांनी अंतरा त्यागी यांच्यासोबत लग्नगाठ बांधण्यापूर्वी साखरपुडा केला. अलिगडमधील तालानगरी भागात या साखरपुड्यासाठी 50 एकरमध्ये चार महालासारखे महामंडप उभारण्यात आले होते. VVIP पाहुण्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्यासाठी जेवणात 50 ते 60 प्रकारचे पदार्थ होते.

Kalyan Singh Grandsons Engagement 2

कल्याण सिंह यांच्या नातवांचा राजेशाही साखरपुडा

VVIP पाहुण्यांची मोठी गर्दी

VVIP पाहुण्यांसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर होती. या साखरपुड्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीच नाही तर केंद्रातील अनेक बडे नेतेही उपस्थित होते. तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावली होती. मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. वाहनतळावरही वाहनांची तपासणी करण्यात येत होती. या साखरपुड्यासाठी वैध पास तपासण्यात येत होता. विशेष म्हणजे कल्याण सिंह यांच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक यांनी सुद्धा सुरक्षा व्यवस्थेतून जात सहकार्य केले.

1000 हून अधिक पोलीस तैनात

VVIP प्रोटोकॉलनुसार, विविध प्रवेशद्वार आणि एका विशेष मंडपाची व्यवस्था करण्यात आली होत. या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी 1,000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमात सुरक्षा यंत्रणा अलर्ट होती. प्रत्येक प्रवेशद्वारावर कसून चौकशी आणि पास तपासण्यात येत होता. दिल्लीत या दोन्ही भावांचे 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी लग्न होणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?