AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींना कमजोर करण्यासाठी देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न; भाजप मंत्र्यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Jaykumar Gore Slams Opposition: जिंकले की गुलाल आणि हरले की ईव्हीएमवर खापर, असं म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

नरेंद्र मोदींना कमजोर करण्यासाठी देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न; भाजप मंत्र्यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
Jai Kumar Gore Slams Opposition
| Updated on: Nov 14, 2026 | 11:56 PM
Share

रहिमतपूर येथील विविध विकासकामांच्या कार्यक्रमात बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर घणाघाती टीका केली. मोठ्या शहरांमध्ये आंदोलने करून देशात अराजकता माजल्याचा खोटा प्रचार काँग्रेस करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने निर्माण केलेल्या संविधानिक संस्थांवर आणि न्यायव्यवस्थेवर स्वतःच्या सोयीनुसार संशय व्यक्त केला जात आहे, असं मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे. त्यांनी विरोधकांवर जहरी टीका केली आहे. त्यांचे वक्तव्य आता चर्चेत आले आहे.

यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, न्यायालयाचा निकाल विरोधात गेला किंवा निवडणूक हरली की न्यायव्यवस्था आणि ईव्हीएम मशीन पंतप्रधान मोदींनी मॅनेज केल्याची ओरड करायची, हाच विरोधकांचा नरेटिव्ह आहे. याच कराड उत्तरचे माजी आमदार तीन-चार वेळा ईव्हीएमद्वारेच निवडून आले तेव्हा त्यांनी गुलाल उधळला, मात्र आता पराभव होताच ईव्हीएमवर खापर फोडले जात असल्याचा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला.

ते म्हणाले की, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्याने काँग्रेस आणि विरोधी पक्षांचा आत्मविश्वास पूर्णपणे खचला आहे. जनतेने नाकारल्यामुळे पुन्हा सत्तेत येता येणार नाही या बेचैनीतून विरोधक श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळप्रमाणे भारतातील युवकांना भरकटवून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.

मजबूत होत चाललेला भारत परदेशी शक्तींना नको असल्याने देशाची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींना कमजोर करण्यासाठी या शक्ती विरोधकांना मदत करत असल्याचे गोरे म्हणाले. मात्र, केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम सरकार असल्याने कितीही विरोधी शक्ती एकत्र आल्या तरी त्या देशाला अस्थिर करू शकणार नाहीत, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Follow Us
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?