उत्तर प्रदेशात मोठा उलटफेर? घाम फोडणारा सर्व्हे, या पक्षाचं सरकार येणार
उत्तर प्रदेश 2027 विधानसभा निवडणुकांपूर्वी Vote Vibe सर्व्हेनुसार भाजप आघाडी आणि समाजवादी पार्टीत जोरदार लढत अपेक्षित आहे. 41.9% मतांसह भाजप आघाडीवर असली तरी, सपा 39.1% मतांनी पाठलाग करत आहे. ग्रामीण भागात चुरस, शहरी भागात भाजप तर, ओबीसी आणि दलित मतांमध्ये विभागणी दिसून येत आहे. ही निवडणूक भाजपसाठी अवघड ठरू शकते.

उत्तर प्रदेशात 2027 मध्ये विधानसभेच्या निडणुका होत आहेत. त्यापूर्वीच Vote Vibeचा एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेनुसार भाजप आघाडी आणि समाजवादी पार्टीच्या आघाडीत चुरशीची लढत होताना दिसत आहे. 2027च्या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या आघाडीला मतदान करायला आवडेल? असा सवाल या सर्व्हेतून करण्यात आला आहोत. त्यावर 41.9 टक्के लोकांनी भाजप आघाडीला मतदान करणार असल्याचं सांगितलं आहे. तर 39.1 टक्के लोकांनी समाजवादी पार्टीच्या नेतृत्त्वातील आघाडीला मतदान करणार असल्याचं म्हटलं आहे. बसपाला 6.4 टक्के आणि इतरांना 4.9 टक्के लोकांनी मतदान करणार असल्याचं म्हटलं आहे. तर 7.8 टक्के लोकांनी कुणालाच मतदान करणार नसल्याचं म्हटलं आहे. या सर्व्हेच्या आकडेवारी नुसार उत्तर प्रदेशात मोठा उलटफेर होताना दिसत आहे. या सर्व्हेतील हे धक्कादायक आकडे पाहता भाजपसाठी ही निवडणूक भारी पडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
Vote Vibe च्या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात समाजवादी पार्टी आणि भाजप आघाडीत चुरशीची लढाई होताना दिसत आहे. ग्रामीण भागात दोन्ही पक्षांची मोठी ताकद आहे. तर, उत्तर प्रदेशातील शहरी भागात भाजपला आघाडी मिळताना दिसत आहे, असं हा सर्व्हे सांगतो. शहरातील मतदारांनी भाजपला पहिली पसंती दर्शवली आहे. आकडेवारीनुसार यूपीत भाजपचं सरकार येणार असल्याचं दिसत असलं तरी भाजप आणि सपात अत्यंत क्लोज टू क्लोज फाईटही होताना दिसत आहे.
पश्चिम यूपीत भाजपच
पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपची स्थिती मजबूत असल्याचं दिसत आहे. या ठिकाणीही भाजपचा सामना समाजवादी पार्टीच्या आघाडीशी होणार आहे. अवधमध्ये समाजवादी पार्टीची स्थिती मजबूत आहे. पूर्वांचल आणि बुंदेलखंडमधील मतदारांचा कलही समजून घेण्यात आला. त्यानुसार, या दोन्ही परिसरात भाजप आणि समाजवादी पार्टीच्या आघाडीत मोठी लढत होणार असल्याचं दिसून येत आहे.
ओबीसी मतदार काय म्हणाले?
Vote Vibe च्या सर्व्हेत ओबीसी मतदारांबाबतचीही माहिती देण्यात आली आहे. यादव मतदार समाजवादी पार्टी सोबत राहणार आहेत. तर गैर यादव मतदारांची पहिली पसंती भाजप असणार आहे. दलित मतदारांमध्ये जाटव मतदारांचा कल बसपाकडे आहे. गैर जाटव दलित भाजपसोबत असणार आहेत. भाजपसोबत समान्य वर्गातील 66 टक्के मतदार असल्याचं सांगितलं जात आहे.
