Ganesh Naik: गणेश नाईक यांचा डीएनए चेक करायला पाहिजे, ते नक्की… नवी मुंबईत कलगीतूरा, भाजप आमदारांकडूनच मोठी टीका
Manda Mhatre on Ganesh Naik: नवी मुंबई ते ठाण्यात शिंदे सेना विरुद्ध मंत्री गणेश नाईक असा कलगीतूरा नेहमी रंगतो. नाईक हे शिंदे यांच्यावर टीकेची संधी सोडत नाही. पण यावेळी भाजपच्याच आमदारांनी त्यांच्याविरोधात चाप ओढल्याने खळबळ उडली आहे.

Manda Mhatre on Ganesh Naik: वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे या दोघांमधील विस्तव जाता जात नाही. नवी मुंबईकरांच्या गरजेची असलेली शहरातील अनेक कामे मी आमदार म्हणून मंजूर करून आणल्या नंतर त्याला विरोध करायचे काम येथील भाजपाचे नेते करीत आहेत. रूग्णालय , लॅब्ररी, मरिना सेंटर , स्टेडियम अशी शहरवासीयांसाठी गरजेची कामे सरकार कडून मंजूर केली आहेत. यासाठी करोडो रुपयांचा निधी आणला आहे . याला विरोध करून ती कशी होणार नाहीत याची काळजी नवी मुंबईतील भाजपाचे नेते गणेश नाईक घेत आहेत. भाजप आमदारांच्या कामाला भाजपचा मंत्री विरोध करीत असल्याने हे नक्की भाजपाचे आहेत का याची डीएनए टेस्ट करायला पाहिजे असा गंभीर आरोप भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केलाय.
नेमका आरोप काय?
नवी मुंबईत हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होणं गरजेचं होतं. महाराष्ट्रातील पहिला आणि देशातील दुसरा मरिना प्रकल्प आपण आणला. तो सुद्धा कशापद्धतीने अडवला, त्याचे काम कशा पद्धतीने आडवलंय हे आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्र भवनाचं काम चालू आहे. प्रत्येक कामामध्ये अडथळा आणण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: आयुक्तांना सांगितलं असतानाही हॉस्पिटलचा प्रकल्प रखडला असल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांविरोधात केला आहे.
आमदारांचे आरोप नगरसेवकांनी फेटाळले
भाजप आमदारांच्या कामाला भाजपचा मंत्री विरोध करीत असल्याने हे नक्की भाजपाचे आहेत का याची डीएनए टेस्ट करायला पाहिजे असा गंभीर आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी केलाय. दरम्यान मंदा म्हात्रे यांचे आरोप गणेश नाईक समर्थक नगरसेवकांनी फेटाळले आहेत. काही तांत्रिक गोष्टीमुळे कामे मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उदय सामंत यांची गणेश नाईकांवर टीका
ते भाजपचे नेते आहेत, त्यांनी उद्योग विभागवार बोलण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांसोबत बोलावे. त्यांच्याकडे वन विभाग आहे, त्यामध्ये काही गोष्टी करत असताना त्यांनी मला सांगावे असे अपेक्षित नाही. मी पण त्यांना सांगणे अपेक्षित नाही. त्यांनी प्रकल्पाबद्दल थेट मुख्यमंत्र्यांना विचारावे, असे मंत्री उदय सामंत यांनी गणेश नाईक यांना सुनावले.
