AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात मोठा राजकीय भूकंप? उद्धव ठाकरे यांना मोठा झटका? ऑपरेशन टायगरची तारीख आणि मुहूर्तही ठरला? मोठी अपडेट काय?

Operation Tiger Shivsena: रविवार असला तरी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा सुरू असतानाच मातोश्रीवर बैठक होत आहे. यामध्ये दोन खासदार हे ऑनलाईन तर काही खासदार उपस्थित असतील. तर दोन खासदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात मोठा राजकीय भूकंप? उद्धव ठाकरे यांना मोठा झटका? ऑपरेशन टायगरची तारीख आणि मुहूर्तही ठरला? मोठी अपडेट काय?
ऑपरेशन टायगर, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेImage Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Jun 14, 2026 | 12:54 PM
Share

Uddhav Thackeray And Eknath Shinde: रविवारी राज्यात मोठी राजकीय घडामोड घडत आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीला सद्या खासदार अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, संजय राऊत, विनायक राऊत हे उपस्थित झाले आहे तर दोन खासदार हे ऑनलाईन उपस्थित असतील. दोन खासदार सध्या नॉट रिचेबल आहे. इतर खासदार लवकरच मातोश्रीवर पोहचत आहेत. दरम्यान ऑपरेशन टायगरचा मुहूर्त आणि तारीख ठरल्याची माहिती शिंदे सेनेच्या एका बड्या नेत्याने टीव्ही ९ मराठीला दिली आहे. पुढील आठवड्यात मोठा खेला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील आठवड्यात ऑपरेशन टायगर?

येत्या 7-8 दिवसात ठाकरे सेनेचे काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दिसतील असा दावा मोठ्या नेत्याने केला आहे. ऑपरेशन टायगरची तारीख आणि मुहूर्त या नेत्याने सांगितला आहे. पण किती आणि कोण खासदार शिंदे सेनेसोबत येतील याची माहिती त्यांनी दिली नाही. त्यामुळे शिंदे सेनेत जाणारे खासदार कोण हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. येत्या एक ते दोन दिवसात याविषयीची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दोन खासदार नॉट रिचेबल

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांचा मोबाईल सकाळपासून लागत नसल्याची माहिती समोर आली आहे. तर परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याविषयी माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी त्यांनी उद्धव सेना सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यांनी राजकीय व्यावहारिकपणाचे संकेत दिले होते. तर खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख हे ऑनलाईन उपस्थित असतील.

दहा दिवसांनी राजकीय भूकंप?

येत्या दहा दिवसात एकनाथ शिंदे यांच्या सेनेत उद्धव सेनेचे काही खासदार येण्याची शक्यता बड्या नेत्याने वर्तवली आहे. येत्या दहा दिवसात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता या नेत्याने वर्तवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा होत आहे. त्यातच काही खासदारांनी बैठकांना दांडी मारल्याने चर्चाला उधाण आले होते. पण अद्याप एकही खासदार शिंदे सेनेत गेलेला नाही. त्यात आता पुन्हा काही खासदार शिंदे सेनेत येण्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा कितपत खरा ठरतो यासाठी अजून दहा दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Follow Us
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार