AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊसाहेब वाकचौरे काठावरच? सकाळपासून नॉट रिचेबल, बैठकीला पुन्हा दांडी? ठाकरे गटात अस्वस्थता

Uddhav Thackeray Shivsena Meeting: ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा असताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. पण या बैठकीअगोदरच मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे सकाळपासून नॉट रिचेबल असल्याचा दावा समोर येत आहे.

भाऊसाहेब वाकचौरे काठावरच? सकाळपासून नॉट रिचेबल, बैठकीला पुन्हा दांडी? ठाकरे गटात अस्वस्थता
उद्धव ठाकरे, भाऊसाहेब वाकचौरेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jun 14, 2026 | 11:41 AM
Share

MP Bhausaheb Wakchaure not reachable: आज उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीला काही खासदार खासगी कामानिमित्त व्हर्च्युअली उपस्थिती असतील असा दावा थोड्यावेळापूर्वी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी केला. तर आता नवीन राजकीय घडामोडींमुळे उद्धव सेनेते अस्वस्थता पसरल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे सकाळपासून नॉटरिचबेल असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांचा फोन सकाळपासून लागत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ते मातोश्रीवर होणाऱ्या आजच्या (१४ जून) बैठकीला उपस्थित असतील का? याची उत्सुकता ताणल्या गेली आहे. त्यांचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.

ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात?

गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचे खासदार, मंत्री आणि आमदार यांनी पुन्हा ऑपरेशन टायगरला हवा दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी या दाव्यांमध्ये काही तथ्य नसल्याचा दावा करत उद्धव सेना ऑपरेशन लांडगा राबवले असे प्रत्युत्तर दिले आहे. ७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत डेरेदाखल होते. त्यावेळी उद्धव सेनेचे काही खासदार त्यांच्या संपर्कात होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ऑपरेशन टायगर लवकरच पुर्णत्वास जाईल असा दावा केला आहे. दुसरीकडे आमदार निलेश राणे यांनी तर आमच्याकडे सातत्याने इनकमिंग सुरू आहे, मातोश्रीवरील आजच्या बैठकीला कोण उपस्थित राहतं ते पाहा असा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे या बैठकीवर ऑपरेशन टायगरचे सावट उभं ठाकलं आहे.

अंगणातील सभेला वाकचौरेंची पाठ

जूनच्या सुरुवातीलाच शिर्डी येथे ठाकरे सेनेचा मेळावा झाला. या मेळाव्याला खुद्द ठाकरे सेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दांडी मारली. अंगणातील सभेलाच त्यांनी पाठ दाखवल्याने ऑपरेशन टायगरमध्ये अजून एक शिकार झाल्याची चर्चा शिर्डीत रंगली होती. तर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वाकचौरेंच्या अनुपस्थितीवर जोरदार प्रहार केला. त्यांनी याप्रकारावर तीव्र नाराजी जाहीर केली. वाकचौरेंवर उघड नाराजी व्यक्त केली. वाकचौरे यांनी विरोधी गटात जाऊ नये असा सल्ला खैरे यांनी वाकचौरेंना दिला होता. वाकचौरेंसारखे यांच्या या बदलत्या भूमिकेची मतदारसंघातही मोठी चर्चा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपविरोधात शिंदे सेना प्रबळ होऊ पाहत तर मराठवाड्यातही शिंदे सेना मोठी स्पेस शोधत आहे. पश्चिम विदर्भात बच्चू कडू यांना पक्षात घेऊन शिंदे सेनेने मोठी पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून मुंबईसह मराठवाड्यात भाजपसमोर मोठे आव्हान उभं करण्याची तयारी सुरू असल्याची गोटातील माहिती सूत्रांनी दिली आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा