AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : कार्गो जहाजाच्या तळाला नेहमी लाल रंग का लावलेला असतो ? वाचा समुद्राशी जुळलेले यामागचे रहस्य

जहाजांना तुम्ही अनेकदा पाहिले असेल कोणतेही मालवाहू कार्गो जहाज वरुन कोणत्याही रंगाने रंगवलेले असले तरी खाली तळाला मात्र, त्याला लाल डार्क रंग दिलेला असतो. काय आहे या मागचे कारण ?

GK : कार्गो जहाजाच्या तळाला नेहमी लाल रंग का लावलेला असतो ? वाचा समुद्राशी जुळलेले यामागचे रहस्य
| Updated on: Nov 01, 2026 | 11:39 PM
Share

तुम्ही बंदरावर उभी असलेले विशाल समुद्र जहाजे पाहिली असतील मात्र, तुम्ही कधी लक्षपूर्वक पाहिले आहे की जहाजाचा वरचा भाग सफेद, काळा, पिवळा कोणताही रंगाचा असला तरी पाण्याच्या आतील भाग नेहमी डार्क लाल रंगाचा असतो.या मागे कोणतेही सुंदर डिझाईन वा अन्य काही राज लपलेले आहे का ? वास्तवात हे काही साधारण रंग-रोगण नाही. तर या मागे विज्ञान आणि सुरक्षा याचा तालमेल लपला आहे.

समुद्रातील छुपे रुस्तम दुश्मन

कोणतेही जहाज अनेक महिने समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून प्रवास करत असते. पाण्यात अनेक छोटे -छोटे जीव-जंतू, काई, शिंपले आणि समुद्री वनस्पती त्याच्या खालच्या पृष्ठभागावर घर बनवतात. याला वैज्ञानिक भाषेत ‘बायोफाऊलिंग’ म्हटले जाते. हे छोटे जीव जहाजाला त्रासदायक ठरतात. जेव्हा लाखोच्या संख्येत हे जीव जहाजाला चिकटतात. तेव्हा जहाजाचे वजन अनेक टनाने वाढते.

स्पीड घटतो आणि इंधनाचा खर्च वाढतो.

जहाजात तळावर जीवजंतू आणि प्रवाळाचा मोठा थर जमल्याने त्याचा खालचा गुळगुळीत भाग खडबडीत होतो. जेव्हा हा खडबडीत भाग पाण्याला कापत पुढे जातो. तेव्हा पाण्यासोबत त्याचे जास्त घर्षण होते. या घर्षणाने जहाजाचा वेग कमी होतो. सामान्य वेग कायम ठेवण्यासाठी जहाजाच्या इंजिनाला अतिरिक्त ताकद लावावी लागते. त्यामुळे इंधन अधिक संपते. त्यामुळे लाखो लिटर महागड्या इंधनाच्या बचतीचे शिपिंग कंपन्यांचे गणित बिघडते.

तांब्याच्या पेंटची कमाल

या संकटातून वाचण्यासाठी संशोधक आणि खलाशांनी एक खास प्रकारचा लेप तयार केला आहे. ज्यास ‘एंटी-फाऊलिंग पेंट’ म्हणतात. आधीच्या काळात या पेंटला तयार करण्यासाठी तांब्याचा वापर केला जायचा. तांबे समुद्री जीव आणि प्रवाळांसाठी विषासमान असते. त्यामुळे हा पेंट असेल तर जीव तेथे चिकटत नाहीत आणि जहाजाचा तळ स्वच्छ रहातो. कॉपर ऑक्साईडचा नैसर्गिक रंग लाल असतो. त्यामुळे या रक्षक पेंटला तळाला लावले तर त्याचा रंग आपोआप लाल होतो.

आजच्याकाळात विज्ञान इतके पुढे गेले आहे तर आपण कोणा अन्य रंगाचा पेंट तयार करु शकत नाही का ? बिलकुल तयार करु शकतो.

आजचे तंत्रज्ञान आणि रसायने एंटी फाऊलिंग पेंटला निळा, काळा वा कोणत्याही रंगात तयार करु शकते. परंतू तरीही लाल रंगाचा सर्वाधिक वापर का होतो.? कारण लाल रंग समुद्री जगतातील एक जुनी आणि प्रसिद्ध परंपरा बनला आहे. ज्याला आजही वापरले जाते.

सुरक्षा आणि वजन मोजण्यास मदतगार

परंपरा शिवाय याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे सुरक्षेशी जोडले गेले आहे. प्रत्येक कार्गो जहाजाचा बाहेरील भाग सफेद वा पिवळ्या रंगाने काही नंबर आणि एक खास लाईन तयार केलेली असते, ज्यास ‘प्लिमसोल लाइन’ म्हणतात. ही लाईन सांगते की जहज सुरक्षितरुपाने किती माल लादू शकते आणि पाण्याच्या आत जहाज किती बूडू शकते. डार्क लाल रंगाच्या बॅकग्राऊंडवर सफेद वा पिवळ्या रंगाचे हे निशान खूप स्वच्छ आणि दूरवरुन दिसते.यामुळे बंदरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जहाज ओव्हरलोड झाल्याचे लागलीच कळते.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती