AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ZP Election: या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, काय आहे तो ‘सुप्रीम’ निर्णय? नेत्यांसह कार्यकर्ते हिरमुसले

Supreme Court on ZP And Panchayat Samiti Election: राज्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. तर उर्वरीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना मोठा ब्रेक लागला आहे. याप्रकरणी न्यायालयाने सर्वोच्च निकाल दिला आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

ZP Election: या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, काय आहे तो 'सुप्रीम' निर्णय? नेत्यांसह कार्यकर्ते हिरमुसले
त्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना सध्या ब्रेकImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 24, 2026 | 9:30 AM
Share

Local Body Election : आरक्षणाची 50% ची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई करण्यात आली आहे.राज्य सरकारने न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणुका घेऊन देण्याची विनंती केली होती, मात्र ही मर्यादा ओलांडलेल्या 22 जिल्हा जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. या निकालामुळे उर्वरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्ते हिरमुसले आहे. जोपर्यंत 50 टक्के आरक्षणाविषयीची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत या निवडणुकींना ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका

बंटीया समितीच्या आधी जी स्तिथी होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्क्यांच्या पुढे गेली होती.या ठिकाणचा निकाल न्यायालयीन निर्णयाच्या अधीन असेल, असे खंडपीठाकडून सांगण्यात आले होते.राज्यात दुसऱ्या टप्प्यात आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे 22 जिल्हा परिषदा आणि काही पंचायत समितीमधील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. आतापर्यंत 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत

22 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे उर्वरित 22 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत. “न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निवडणुका घेण्याची परवानगी दिली जावी,” अशी विनंती राज्य सरकार तर्फे महाधिवक्ते तुषार मेहता यांनी केली. मात्र सुनावणीदरम्यान अशा प्रकारची परवानगी देता येणार नाही अशी खंडपीठाने स्पष्ट केले.

ओबीसी आरक्षण संदर्भातील बंटीया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणारी स्वतंत्र्य याचीका दाखल झाली असून त्यावर आगामी काळात सुनावणी होऊ शकते. अहिल्यानगर जालना आणि बीड या जिल्हा परिषदांचे आरक्षण 50 टक्के च्या आत असले तरी, त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीमध्ये ओबीसी आरक्षण 27 टक्के पेक्षा अधिक झाले आहेत. त्यामुळे या जिल्हा परिषदांसह तेथील पंचायत समित्यांच्या निवडणुका ही सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निकालापर्यंत घेता येणार नाही

राज्यात या ठिकाणी ओलांडली आरक्षण मर्यादा

ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अहिल्यानगर, जालना, बीड

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...