तोंडातून रक्त येत होतं अन्… स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. नीट पेपर फुटी तसेच देशातील शिक्षणव्यवस्थेवर राहुल गांधी यांनी बोट ठेवले आहे. सोबतच त्यांनी काल पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हाचा प्रकर सांगितला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. नीट पेपर फुटी तसेच देशातील शिक्षणव्यवस्थेवर राहुल गांधी यांनी बोट ठेवले आहे. सोबतच त्यांनी काल पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हाचा प्रकर सांगितला.
कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. काहीही झालं तरी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका सीजेपीची आहे. काँग्रेसनेही हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. 21 जुलै रोजी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोरच साडे तीन तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला घेरलं आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, “पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं माझ्या तोंडातून रक्त येत होतं… फरफटत न्हेलं.” सध्या त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा आहे.
Published on: Jul 22, 2026 05:22 PM
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

