Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
NEET पेपरफुटी प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत देशातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांनी पेपरफुटीच्या घटनांवर केंद्र सरकारवर टीका केली.
NEET पेपरफुटी प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत देशातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांनी पेपरफुटीच्या घटनांवर केंद्र सरकारवर टीका केली.
राहुल गांधी म्हणाले की, पेपरफुटी ही देशासमोरील अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. या घटनांमुळे अनेक विद्यार्थी नैराश्यात गेले असून, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांनी केला. शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याची मागणी विद्यार्थी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी राहुल गांधी यांनी दावा केला की, गेल्या दहा वर्षांत देशात तब्बल 152 पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्याचा परिणाम सुमारे 5 कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांवर झाला आहे.
ते पुढे म्हणाले की, पेपरफुटीच्या घटनांमध्ये जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई होत नसल्याने अशा प्रकारांना आळा बसत नाही. “गेल्या दहा वर्षांत एकालाही शिक्षा झालेली नाही. कोणीतरी देशाची शिक्षण व्यवस्था पोखरत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, तरुण रस्त्यावर का उतरले आहेत, याचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तसेच देशातील शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांसाठी परवडणारी आणि विश्वासार्ह राहिलेली नसल्याची टीकाही त्यांनी केली.
Published on: Jul 22, 2026 05:22 PM
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी

