Devendra Fadnavis | धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर, सर्व धर्मांसाठी समान तरतुदी लागू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडले आहे. या विधेयकावर सध्या विधानसभेत चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे हे विधेयक मांडणारे पहिले राज्य नाही; यापूर्वी 12 राज्यांमध्ये असे नियम लागू आहेत. हे विधेयक कोणत्याही एका धर्मासाठी किंवा धर्माविरुद्ध नाही, तर सर्व धर्मांसाठी समान आहे. राज्यात अनेक वेळा धर्मांतर आणि विवाह संबंधित मुद्द्यांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे उदाहरणे घडली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडले आहे. या विधेयकावर सध्या विधानसभेत चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे हे विधेयक मांडणारे पहिले राज्य नाही; यापूर्वी 12 राज्यांमध्ये असे नियम लागू आहेत. हे विधेयक कोणत्याही एका धर्मासाठी किंवा धर्माविरुद्ध नाही, तर सर्व धर्मांसाठी समान आहे. राज्यात अनेक वेळा धर्मांतर आणि विवाह संबंधित मुद्द्यांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे उदाहरणे घडली आहेत. सध्याच्या न्याय संहितेत याबाबत स्पष्ट तरतुदी नाहीत. म्हणून धर्मस्वातंत्र्य विधेयक तयार केले गेले आहे. यामध्ये बळजबरी, फसवणूक, लबाडी किंवा अल्पवयीन व्यक्तींचे धर्मांतर बेकायदेशीर ठरवले आहे. विधेयकाचा उद्देश नागरिकांचे संरक्षण करणे आणि कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून जबरदस्तीने धर्मांतर न होणे हा आहे. जर यातील तरतुदींचे उल्लंघन झाले, तर संबंधित व्यक्ती किंवा संस्था शिक्षेस पात्र असतील. तसेच, अशा पद्धतीने झालेल्या धर्मांतराला कायदेशीर मान्यता मिळणार नाही, हेही विधेयक स्पष्ट करते. हे विधेयक राज्याच्या अधिकारात येते आणि केंद्रानेही राज्याला असा कायदा करावा, असा सल्ला दिला आहे. यामुळे समाजात सुव्यवस्था राखण्यास मदत होईल आणि दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये संघर्ष टाळला जाईल.
Published on: Mar 16, 2026 06:55 PM
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत

