Devendra Fadnavis Speech | चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, नायगावचे बीडीडी चाळीतील रहिवाशांना अखेर चावी मिळाली; आज दिवाळी
मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल मधील 864 पुनर्वसन सदनिकांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरिकांना प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल मधील 864 पुनर्वसन सदनिकांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरिकांना प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या 5 इमारतींमधील 864 पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरुपात सदनिकांचे वितरण करण्यात आले. यात 423 सदनिकाही पोलिस विभागातील निवृत्त पोलिस, त्यांच्या वारस आणि कार्यरत पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांनी घराची चावी हातात घेताना आनंद व्यक्त केला. अनेकांचे हात थरथर कापत होते, तर काहींचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. घराचा हक्क मिळाल्याचा अनुभव नागरिकांसाठी अतिशय भावनिक होता. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या आनंदात सामील होत आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. आजचा दिवस बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा ठरला.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ

