AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! युद्ध सुरू असतानाच अमेरिकेत हाहाकार, नागरिकांना हाय अलर्ट, रस्ते बंद, 1800 विमानांची उड्डाणं रद्द

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेमध्ये हाहाकार उडाला आहे. नागरिकांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मोठी बातमी! युद्ध सुरू असतानाच अमेरिकेत हाहाकार, नागरिकांना हाय अलर्ट, रस्ते बंद, 1800 विमानांची उड्डाणं रद्द
Donald TrumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 8:56 PM
Share

अमेरिका,इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत इराणंच प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र तरी देखील इराणने माघार घेतलेली नाहीये. इराणकडून मिसाईल हल्ले सुरूच आहेत. इराणच्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलचे अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत. तर दुसरीकडे इराणने आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन सैन्य तळांना देखील लक्ष्य केलं आहे. इराणने अमेरिकेचे अनेक सैन्य तळं उद्ध्वस्त केले आहेत. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचा प्रचंड पैसा खर्च झाला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे इराणने या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होमूर्ज बंद केल्यानं जगभरात मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. त्याचा देखील आता अमेरिकेवर चांगलाच दबाव आल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे अमेरिका युद्धात अडकलेली असताना दुसरीकडे मात्र आता अमेरिकेवर आणखी एक मोठं संकट आलं आहे. या संकटामुळे अमेरिकेत हाहाकार उडाला आहे.

अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये हंगामी वादळानं धुमाकूळ घातला आहे. एका रिपोर्टनुसार अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये वाऱ्याचा प्रचंड वेग आणि तुफान बर्फवृष्टीमुळे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. अमेरिकेच्या पूर्व समुद्रकिनार्‍यावर या वादळाचा सर्वाधिक धोका आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागाकडून येथील नागरिकांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी आसरा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वादळाचा प्रभाव पुढील 48 तासापर्यंत कायम राहू शकतो, त्यानंतर हे वादळ हळूहळू कमी होईल, मात्र त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं, असा इशाराही हवामान विभागाच्या वतीनं यावेळी देण्यात आला आहे.

1800 उड्डाणं रद्द 

समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या उत्तर भागामध्ये तापमान एवढं कमी झालं आहे की, पावसाच्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये झालं आहे. या भागात सुमारे 15 सेंटीमीटरपेक्षा अधिक बर्फ जमा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या विस्कॉन्सिन आणि मिशनिगनच्या काही भागांमध्ये तर 61 सेंटिमीरटपेक्षा अधिक बर्फ जमा झाला आहे. दरम्यान या वादळाचा अमेरिकेच्या हवाई वाहतुकीवर प्रचंड परिणाम झाला आहे. फ्लाइटअवेअर ने दिलेल्या माहितीनुसार या वादळाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 1800 उड्डाण रद्द करण्यात आली आहेत, तर 1400 विमानांच्या फेऱ्या या विलंबाने धावत आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल