तुम्ही अलिकडून आडवलं, आमचं पलिकडून चालू, थोडा अंधार पडू द्या… आमदाराच्या त्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज्यात खळबळ
MLA Narayan Kuche: महापालिका निवडणुकीत पैशांचा महापूर आल्याचा आरोप अनेक उमेदवारांनी केला आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा वाटप झाल्याचा आरोप होत असतानाच बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. काय आहे त्या क्लिपमध्ये?

ज्ञानेश्वर लोंढे /प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार नारायण कुचे यांची बहीण गंगाबाई भिमराव भवरे या प्रभाग 24 मधून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. बहिणीला निवडून आणण्यासाठी नारायण कुचे यांनी प्रभागामध्ये पैसे वाटल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला होता. या प्रकरणात एक ऑडिओ रेकॉर्डिंग क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये नारायण कुचे व व्यक्ती कॉलवर बोलत आहे. आमदाराचे पैसे आहे जनतेचे भलं होऊ द्या, माझ्या बॉडीगार्डला पैसे वाटताना अडवलं. आता मी पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटणार आहे असं या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आमदार नारायण कुचे (MLA Narayan Kuche Viral Audio Clip) बोलत आहेत. ही कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
काय आहे दोघांमधील संवाद
कार्यकर्ता – कुचे साहेब हॅलो हॅलो
आमदार – बोल बोल, बोल न
कार्यकर्ता – थोडासा अंधार पडू द्या न
आमदार – अंधारात कुठे पैसे वाढत असतात गोरगरीब लोकांना नोटा दिसल्या पाहिजे
कार्यकर्ता – अहो कुठे साहेब एक मिनिट ऐकून घ्या सगळीकडे चर्चा सुरू आहे म्हणून म्हणू लागलो तुम्हाला, की थोडासा अंधार पडू द्या
आमदार – अंधारात खेळ नाही जमत, उजेडात होऊन जाऊ दे.
कार्यकर्ता व आमदार दोघेही हसताना
आमदार – तुम्ही आलीकुन अडवलं आमचं पलीकडून चालू आहे
कार्यकर्ता – नाही आडवल नाही तुम्हाला कोण, हे तर तुमचा गैरसमज आहे.
आमदार – दोन दिवस तुम्हाला मी काही म्हणणार नाही तुम्ही काय केलं मला माहित आहे.
कार्यकर्ता – शिव्या दिल्या नाही मी त्यांना बाजूला केलं पोरांना त्यांचा काही संबंध नाही ते बॉडीगार्ड आहेत त्यांना काही बोलू नका, त्याची त्याची ड्युटी आहे ती ड्युटी करू लागले मी त्यांना बाजूला केलं
आमदार – आता मी एक PI ची गाडी मागितली सात-आठ पोलीस, पोलीस बंदोबस्तात पैसे वाटीतो आता,
कार्यकर्ता – बिनधास्त वाटा कुचे साहेब पण मी काय म्हणतो थोडासा अंधार पडू द्या.
आमदार – गोरगरीब जनतेचे भलं होऊ द्या ना
कार्यकर्ता – अहो आमदार साहेब, आतापर्यंत तुम्ही भलच करत आलेले आहेत न,
आमदार – चालन वाटतो मी
कार्यकर्ता – तिथे आम्ही नाही मात्र थोडासा अंधार पडू द्या, दिवसाढवळ्या एवढे चालू झालं म्हटल्यावर आमदार म्हणून दिवसाढवळ्या एवढं करत असेल तर थोडंसं वाटतं
आमदार – ठीक आहे ठेव ठेव
ऑडिओ रेकॉर्डिंग खोटी – नारायण कुचे
हा दावा खोटा आहे.तुम्ही नंबर चेक करा, नंबर त्यांचा आहे आवाज त्यांचा आहे. यात कोणतीही खडाखोड केलेली नाही.13 तारखेला मी अकरा वाजून वीस मिनिटाला फोन केला आहे. याच्यामध्ये कोणतीच खाडाखोड नाही आम्ही तसं करणार पण नाही असे आमदार नारायण कुचे म्हणाले. मला अशा बऱ्याच जणांच्या धमक्या आल्या आहेत. मला बरेच जण बोलू लागले आहेत. आम्ही चौकशीला समोर जायला तयार आहे. त्यांनी पण आमने-सामने येऊन बोलावं की मी फोन केलेला नाही, हा माझा फोन नंबर नाही डुप्लिकेट आहे. ते तर सांगणार झाले हे ऑडिओ क्लिप खोटी आहे ते त्यांच्या अंगावर येऊ देणार नाहीत. त्यांनी माझ्यावर आब्रू नुकसान चा दावा केला तर मी पण त्यांच्यावर तेच दावा करेल जर हे खोटं असेल तर. माझ्यावर जी कारवाई होईल त्या कारवाईला मी समोर जायला तयार आहे हे जर खोटं असेल तर मी कोणत्याही प्रकारच्या दबावाला व समाजात प्रतिष्ठा वाढावी म्हणून मी काय करत नाही, असा टोला कुचे यांनी लगावला.
आमदारांनी लोकशाहीचा गळा घोटला
तर नारायण कुचे यांच्या बहिणीविरोधात लढलेले आणि पराभूत उमेदवार सतीश गायकवाड यांनी कुचेंवर गंभीर आरोप केले आहेत. पैसे वाटण्याचे व्हिडिओ क्लिप पण असेल अनेक वेळा आम्ही पोलिसांना कळवलं होतं. सुरुवातीपासून हा डाव त्यांचा चालू होता त्यांनी सांगितले की आम्हाला जनाधार मिळाला तर मिळाला तर त्यांनी पैसे का वाटले, असा सवाल गायकवाड यांनी केला.अंबड, जालन्यावरून तुम्ही मतदान का आणलं, आमच्याकडे प्रूफ आहेत. जालना अंबड मतदारसंघातून त्यांनी दोन ते अडीच हजार मतदान आणलं. मयत झालेल्या लोकांच सुद्धा त्यांनी मतदान करून घेतलं. लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सर्वद्वारे आमदारांनी शासन करत असेल तर आमच्या गरिबांनी लढावं की नाही. अशा अनेक आमच्याकडे फोटोज आहेत अनेक घरात मीटिंग झाले आहेत पैसे देवाण-घेवाण झाली आहे. आमदार कुचे यांनी या ठिकाणी आठ ते नऊ कोटी रुपये खर्च केले त्यांच्याकडे जनाधार होते तर त्यांनी पैसे का वाटले, असा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला.
