AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate Today 12 February 2026 : हाय का आता ? चाललं काय हे..? आता चांदी आणि सोनंही स्वस्त; उद्याचा भरोसा नाही, आजच…

Gold-Silver Rate Today 12 February 2026 Latest News Updates in Marathi : सर्वसामान्यांसाठी आज पुन्हा आनंदाची बातमी आहे. सोनं आणि चांदी पुन्हा स्वस्त झाले आहेत. गुरुवारी सकाळी एमसीएक्सवर व्यवहार सुरू होताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्या. चांदी आता 1.59 लाखांनी स्वस्त उपलब्ध आहे.

Gold-Silver Rate Today 12 February 2026 : हाय का आता ? चाललं काय हे..? आता चांदी आणि सोनंही स्वस्त; उद्याचा भरोसा नाही, आजच...
सोनं-चांदीचे दर पुन्हा खाली
| Updated on: Feb 12, 2026 | 10:46 AM
Share

सोनं आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Rate) चढ-उताराचा खो-खो सुरूच आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, दोन्ही मौल्यवान धातूंनी विक्रमी उच्चांक गाठला, परंतु अचानक सोनं-चांदीचे भाव (Gold and Silver Price Crash) कोसळल्याचंही पहायला मिळालं. यानंतर, आता दोन्ही धातूंच्या किमतीत चढ-उतार होतच राहिले आहेत. गुरुवारी, आठवड्याच्या चौथ्या दिवशी, चांदीच्या किमती पुन्हा घसरल्या आहेत. (Silver Price Fall) एवढंच नव्हे तर सोन्याच्या किमतीतही बरीच घसरण झाली असून सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा आनंदाचा दिवस म्हणावा लागेल. सर्वकालीन उच्चांकापेक्षा आता चांदी 1.59 रुपयांनी कमी दराने उपलब्ध आहे.

कुठपर्यंत घसरणार चांदीचे दर ?

गुरूवारी बाजार सुरू होताच चांदीच्या दराने सुळक्कन खाली घसरण घेतली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर 5 मार्टची एक्सपायरी असलेल्या चांदीचे दर आदल्या दिवशी 2,63,018 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. मात्र आज (गुवार) बाजार उघताच तो आणि तो उघडताच खाली घसरून 2,60,453 रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ असा की 1 किलो चांदीची किंमत एकाच झटक्यात 2 हजार 565 ५ रुपयांनी कमी झाली. काही तज्ञांचा अंदाज आहे की नजीकच्या काळात चांदी प्रति किलो 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल, मात्र ती पुन्हा वाढू सकते असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे.

आता किती स्वस्त झाली चांदी ?

या वर्षी जानेवारीमध्ये चांदीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. 29 जानेवारी रोजी, इतिहासात पहिल्यांदाच चांदीचा भाव 4 लाख रुपयांच्या पुढे गेला आणि चांदीने 4,20,048रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला. मात्र एवढी, सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर, आता या धातूच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. गुरुवारच्या सुरुवातीच्या किमतीच्या तुलनेत, 1 किलो चांदी आता1 ,59,595 रुपयांपर्यंत (Silver Cheaper) उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चांदीसोबत सोनंही घसरलंच

तर सोन्याच्या किमतीही घसरल्याने ग्राहक खुश आहेत. गुरुवारी कमोडिटी बाजारात व्यवहार सुरू झाल्यावर केवळ चांदीच्या किमतीत घसरण झाली नाही तर सोन्याच्या किमतीतही घसरण झाली आणि ती 1000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाली. आदल्या दिवशी, म्हणजेच बुधवारी, 2 एप्रिल रोजी एक्सपायरी डेट असलेले 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 1,58,755 इतके रुपये होते. आणि आज सकाळी मार्केट सुरू झल्यावर सोन्याचे दर घसरून 1,57,701 रुपयांवर पोहोचले. म्ह म्हणजेच सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 1 हजार054 रुपयांची घसरण झाली.

चांदीप्रमाणेच, सोन्याच्या किमतीनेही 29 जानेवारी रोजी विक्रमी उच्चांक गाठला. सोन्याच्या कमिती वायूवेगाने वाढू वेगाने वाढून 1,93,096 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचल्या होत्या. मात्र नंतर हा धातू खाली घसरत राहिला. जर old Rate MCX Highशी तुलना केली तर किंमत सध्या उच्चांकापेक्षा 35,395 रुपयांनी कमी आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ