Video : हनी सिंग? छे… हा तर हनी सिंगचा जत्रेत हरवलेला भाऊ; हनी सिंगची कार्बन कॉपी पाहून नेटकरी पोट धरून हसले
एक तरूण परफॉर्म करायला उभा राहिला. त्याचा लूक पाहून अनेकांना क्षणभर प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगची आठवण झाली. पण हा खरा हनी सिंग नव्हता तर नेटकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा हनी सिंगचा जत्रेत हरवलेला भाऊ होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

स्टेजवर गाणं सुरू झालं, समोर प्रेक्षकांची गर्दी होती आणि माईक हातात घेऊन एक तरूण परफॉर्म करायला उभा राहिला. त्याचा लूक पाहून अनेकांना क्षणभर प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगची आठवण झाली. कपडे, हेअरस्टाईल आणि स्टेजवर वावरण्याची पद्धत… सगळंच हनी सिंगसारखचं! पण हा खरा हनी सिंग नव्हता, तर त्याच्यासारखा दिसणारा एक तरूण होता. या तरूणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा परफॉर्मन्स पाहून नेटकरीही मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.
बजेट कमी म्हणून बोलावला हनी सिंगचा हमशकल
दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ एका छोट्या कार्यक्रमातील आहे. यामध्ये हनी सिंगसारखा दिसणार एक व्यक्ती स्टेजवर उभा राहून गाण्यावर परफॉर्म करताना दिसतो. या व्हिडिओसोबत ‘budget problem please guys plz adjust little bit’ असं मजेशीर कॅप्शन देण्यात आलं आहे. म्हणजेच खऱ्या हनी सिंगला कार्यक्रमासाठी बोलावण्याइतका बजेट नसल्यामुळे त्याच्या हमशकलला बोलावलं आहे प्लीज अॅक्जस्ट करा असं सांगण्यात आलं आहे.
हनी सिंगने रॅप सोडून गायली रोमँटिक गाणी
या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या हमशकल हनी सिंगच्या ‘धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आणा’ या गाण्यावर परफॉर्न्मस दिला. याच गाण्याच्या तालावर त्याने हनी सिंगची स्टाईलही कॉपी करताना दिसतो. त्याच्या गाण्यावर हनी सिंगसाठी जमलेले चाहतेही नाचताना मज्जा करताना दिसत आहेत.
Budget Problem guys plz adjust little bit😭 https://t.co/ZzLJinta6t
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 19, 2026
नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी या व्यक्तीला हनी सिंगचा हमशकल म्हटलं, तर काहींनी त्याच्या लूकवरून मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने मला पण हनी सिंगला भेटवा अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने त्याला हनी सिंगचा जत्रेत हरवलेला भाऊ असं म्हटलं आहे.
खरं तर सेलिब्रिटींसारखे दिसणारे लोक सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत येतात. मात्र, या व्हिडीओमध्ये केवळ चेहराच नाही, तर कपडे आणि स्टेजवरची स्टाईलही हनी सिंगची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून काही क्षणांसाठी प्रेक्षकही गोंधळात पडू शकतात. अर्थात, व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती स्वतः हनी सिंग नसून त्याच्यासारखा दिसणारा एक कलाकार आहे.
