Chhatrapti Sambhajinagar Result: राज्यात गाजलेल्या रशीद मामूंचा निकाल धडकला, कुणाला बसला मोठा धक्का? ठाकरे सेनेला दिलासा?
Chhatrapati Sambhajinagar Mahapalika Election Results 2026: महाराष्ट्रातील सर्वात अवेटेड निकाल अखेर लागला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या रशीद मामूंचा निकाल अखेर धडकला आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते अनेकांनी त्यांच्या जाहीर सभेत मामूंना राज्यात लोकप्रिय केले. त्यांना तिकीट दिल्याने उद्धव सेनेत नाराजी पसरली होती. काय लागला त्यांचा निकाल?

Uddhav Thackeray Rashid Mamu Win: राज्यात एकाएक प्रसिद्ध झालेले छत्रपती संभाजीनगरचे रशीद मामू यांचा निकाल अखेर धडकला आहे. त्यांचा निकाल हा राज्यातील सर्वात अवेटेड निकाल मानल्या जातो. त्यांच्या उमेदवारीवरून राज्यात काहूर उठले होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने रशीद मामूंना तिकीट दिल्याने एकच खळबळ उडाली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी या रशीद मामूंना तिकीट दिल्यावरून रान उठवले होते. तर दुसरीकडे उद्धव सेनेचे एकनिष्ठ आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामूंना तिकीट देण्यास कडाडून विरोध केला होता. अखेर त्यांचा निकाल समोर आला आहे.
रशीद मामू विजयी
Municipal Election 2026
Maharashtra Election Results 2026 : धुळे महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता...
Pune Nagarsevak Election Results 2026 : सोनाली आंदेकर विजयी, थेट जेलमधून...
Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका
Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
पुण्यात रवींद्र धंगेकरांना धक्का, पत्नी पराभूत
हा विजय धन शक्तीचा नाहीत जन शक्तीचा आहे, शंकर जगताप यांचा हल्ला
ठाकरे शिवसेनेचे उमेदवार रशीद मामू छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले. प्रभाग क्रमांक 4 मधून रशीद मामू यांच्यासह 3 उमेदवार विजयी झाले. रशीद मामू यांच्या ठाकरे शिवसेना पक्षप्रवेशावरून जोरदार टीका झाली होती. ते निवडून आल्याने उद्धव सेनेचे जीव भांड्यात पडला असेल. कारण सामाजिक, धार्मिक समीकरणं जुळवताना उद्धव सेनेने स्वकीय दुखावले होते. त्यामुळे रशीद मामू हे निवडून येतील का? अशी चर्चा सुरू झाली होती. ज्या पक्षाने तिकीट दिले. त्याच पक्षाचे काही नेते या तिकीट वाटपावरून नाराज होते.
रशीद मामू यांना तिकीट दिल्यानं माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ज्येष्ठे नेते चंद्रकांत खैरे यांच्यातील शीतयुद्धही समोर आले होते. खैरे यांनी याप्रकरणी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पण प्रभाग क्रमांक 4 मधून रशीद मामू हे विजयी झाल्याने खैरे यांना हा धक्का असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे अंबादास दानवे यांचे बंधू निवडून न आल्याने त्यांनाही धक्का बसला आहे.महापालिकेत कधीकाळी वरचष्मा असलेल्या ठाकरेंना या निवडणुकीत दोन अंकी शर्यतही पूर्ण करता आली नाही. उद्धव सेना एकाच अंकावर अडकलेली आहे. तर शिंदे सेनेला सुद्धा इथे सरस कामगिरी करता आली नाही. दोन्ही शिवसेनाचा एकत्रित विचार केल्यास दोघांना एकूण 20 चा आकडा गाठता आलेला आहे. भाजपने इथं बहुमताचा आकडा जवळ केला आहे.
वंचित आणि पोलिसांमध्ये झटापट
प्रभाग क्रमांक 24 येथून भाजप आमदार नारायण कुचे यांच्या बहिणीला विजय घोषित केल्याने एकच गोंधळ उडाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश गायकवाड यांनी या विजयाला आक्षेप घेतला. एक तास मशीन बंद होती त्यादरम्यान गडबड झाल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि मोठी झटापट झाली.
