Mayor: मराठवाड्यात कुठे महिला राज? छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर कुणाचा? एका क्लिकवर जाणून घ्या
Mayor Reservation in Marathwada: मुंबईत २९ महानगरपालिकेसाठी महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघाली. यामध्ये मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांचा समावेश होता.मराठवाड्याची राजधानीसह या महापालिकेत महिलाराज आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाचा महापौर होणार ?

Mayor Reservation in Marathwada: मुंबईत २९ महानगरपालिकेच्या महापौर पदासाटी आरक्षण सोडत निगाली. यामध्ये मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांचाही समावेश होता. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नव्याने स्थापन झालेली जालना महानगरपालिका, नांदेड-वाघाळा, परभणी आणि लातूर महापालिकेचा समावेश होता. सोडतीत मराठवाड्यातील महानगरपालिकेवर महिला राज आल्याचे दिसून येत आहे.सर्वसाधारण प्रवर्गासह अनुसूचित जातीच्या महिलांकडे महापौर पद चालून आले आहे. त्यामुळे मराठवाड्यात महिलांचा वरचष्मा दिसून येत आहे. यावेळी नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर महिलांना तिकीट देण्यात आले होते. त्यातील अनेक महिला या निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता महापौर पदाची लॉटरी कुणाला लागते याची चर्चा सुरू झाली आहे.
मराठवाड्यातील पाच पैकी चार ठिकाणी महिला महापौर
मराठवाड्यातील पाच पैकी चार महापालिकांमध्ये महिला महापौर असतील. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिला या महापौर पदी असतील. तर नांदेड-वाघाळा या महानगरपालिकेतही खुल्या प्रवर्गातील महिलेला महापौर पदाची संधी मिळाली आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपने मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपच्या महिला नगरसेवकांपैकी कुणाचा या पदासाठी क्रमांक लागतो याची चर्चा सुरू आहे. यापूर्वी ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना-भाजप युतीत महिलांना महापौर पदाची संधी मिळालेली आहे. तर छत्रपती संभाजीनगर मनपा आरक्षण आज सुटल्यानंतर भाजपा खासदार भागवत यांनी प्रतिक्रिया दिली, छत्रपती संभाजीनगर महापालिका महापौर कोण होईल याचा निर्णय वरिष्ठांना विचारून केला जाईल अशी प्रतिक्रिया भागवत कराड यांनी दिली
जालन्यात पहिल्यांदाच महापौरपदी कोण?
तर दुसरीकडे जालनामध्ये पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणूक झाली. इथंही भाजपने मोठी बाजी मारली. जालना महापौरपद हे एससी महिला प्रवर्गासाठी राखीव झालं आहे. सोडतीत इथलं महापौरपदी अनुसूचित जातीची महिला असेल. यामध्ये एससी महिला प्रवर्गात डॉ. रीमा काळे, भाजप, वंदा मगरे, भाजप, श्रद्धा साळवे, भाजप यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या तीन नगरसेविकांपैकी आता कुणाला महापौर पदाची पहिल्यांचा लॉटरी लागते हे थोड्याचवेळात समोर येईल.
परभणी-लातूरमध्ये कोण महापौर?
आज झालेल्या महापौर पदासाठीच्या आरक्षण सोडतीत परभणी महापौर पद हे सर्वसाधारण गटासाठी सुटलं आहे. त्यामुळे इथं आता महिला की पुरुष महापौर होणार याचा निर्णय सर्वाधिक बहुमत असलेले पक्ष घेतील. इथं उद्धव सेनेचा वरचष्मा आहे. जर इथंही महिलेला उद्धव सेनेने संधी दिली तर मग मराठवाड्यातील पाचही महानगरपालिकेवर महिला राज येईल. पाचही महानगरापालिकेत महिलांचा वरचष्मा असेल आणि असा विक्रम पहिल्यांदाच होईल. तर लातूर महापालिकेचे आरक्षण हे एससी महिला प्रवर्गासाठी सुटले आहे. इथं काँग्रेस आणि वंचित हे पक्ष या पदासाठी कोण दावेदार हे ठरवतील.
