लातूर महानगरपालिका निवडणूक 2026
लातूर महानगरपालिकेची मुदत तीन वर्षांपूर्वीच संपली होती, ही निवडणूक कधी होणार? याकडे लातूर शहरातील नागरिकांचं लक्ष लागलं होतं. अखेर आता निवडणूक आयोगाकडून लातूर महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. लातूर महानगपालिकेतील एकूण 18 प्रभागांमधील 50 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. लातूरमध्ये आधी नगर परिषद होती, त्यानंतर 25 ऑक्टोबर 2011 रोजी लातूर नगर परिषदेची महानगरपालिका झाली, लातूरमध्ये 2012 मध्ये पहिली महापालिकेची निवडणूक झाली होती, या महानगर पालिकेवर सुरुवातीपासून काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे.
काँग्रेसमध्ये खळबळ, ऐन निवडणुकीत समीकरण बिघडलं, माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
Latur Politics : लातूर मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अनेक माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपची ताकद वाढली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 26, 2025
- 6:05 pm