Latur Election Results 2026 LIVE: लातूरमधील निष्ठावंतांच्या बंडखोरीचा कुणाला फटका? धनुष्यबाण सुटणार? घड्याळ्याचे काटे फिरणार? निकाल इथं वाचा
Latur Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमधील मोठी खदखद समोर आली. पालिकेच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला. निष्ठावंतांच्या आघाडीने राजकारण पार बदलून टाकले. काय लागला निकाल?

लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत मोठा गेम झाला. भाजपच्या निष्ठावंतांनी मोठी खेळी खेळली. निष्ठावंत कार्यकर्ता आघाडीने भाजपच नाही तर इतर पक्षांची समीकरणं बदलवून टाकली. महापालिकेच्या गणितात नवा ट्विस्टला आला.बंडखोर मैदानात उतरल्याने अनेकांच्या सत्तेच्या स्वप्नाला सुरूंग लागला. निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी महापालिकेच्या मैदानात उतरल्याने धनुष्यबाण आणि घड्याळाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. गेल्या दहा दिवसांच्या प्रचाराच्या धुराळ्यात हा मुद्दा सतत समोर आला. स्थानिकांची त्यांच्या प्रभागात चांगली पकड असल्याने तिकीटधारी उमेदवारांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. आता निष्ठावंतांची आघाडी कुणाला धूळ चारते हे लगेच समोर येईल. आज निकालात कुणाची स्वप्न वाहून जातात आणि कुणाचं स्वप्न स्वस्तात येतात हे समोर येईल.
गेल्यावेळी लातूर महापालिकेत, 2017 मध्ये 36 जागांवर भाजपचे कमळ फुलले होते. तर 32 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले होते.तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला होता.यंदा कुणाच्या पारड्यात मतदार कौल देणार? हे आज समोर येईल.लातूर महानगरपालिकेत चार सदस्य असलेल्या प्रभागांची संख्या 16 इतकी आहे. तर तीन सदस्यांची संख्या 02 इतकी आहे. लातूर शहरासाठी एकूण 18 प्रभाग आहेत. या प्रभागात एकूण 70 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. या पालिकेत तिरंगी निवडणूक होणार आहे. तर बंडखोरांसह काही जण पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात आहे. यंदा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह निष्ठावंतांची आघाडीत निवडणुकीची चुरस दिसून येत आहे.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 7
गेल्यावेळी प्रभाग क्रमांक 7 मध्ये 4 उमेदवार होते. याप्रभागात काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. दिप्ती खंडागळे, युनूस मोमीन, रुबीना तांबोळी, सचिन म्हस्के यांनी बाजी मारली होती. यावेळी या प्रभागात कोण बाजी मारणार याची चर्चा सुरू आहे. प्रभाग 7 मध्ये एकूण लोकसंख्या 23,327 इतकी आहे.
या प्रभागात गारुडी वस्ती, म्हैसूर कॉलनी, सिद्धार्थ सोसायटी, बौद्ध नगर, विवेकानंद चौक, आंबेडकर चौक, कोळसा डेपो, गुजर गल्ली, कृष्णा निवास, तानाजी चौक, देशपांडे गल्ली, गणपती चौक, सिद्धेश्वर चौक असा भाग यामध्ये आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
|---|---|---|
प्रभाग क्रमांक 8
प्रभाग क्रमांकमध्ये गेल्यावेळी 2017 मध्ये भाजपचा वरचष्मा होता. या प्रभागात चारही उमेदवार भाजपचे होते. व्यंकट वाघमारे, जान्हवी सूर्यवंशी, गीता गौड, शैलेश स्वामी या भाजप उमेदवारांनी बाजी मारली होती. काँग्रेसला या प्रभागात खातं उघडता आलं नाही.
प्रभाग क्रमांक 8 ची एकूण लोकसंख्या 20,681 इतकी आहे. या प्रभागात देशपांडे गल्ली, रत्नापूर चौक, हत्ते नगर, लाहोटी कंपाऊंड, खाटीक गल्ली, भोई गल्ली, आझाद चौक, पोचम्मा गल्ली, नावंदर गल्ली, गांधी मैदान, पापविनाश रोड, खडक हनुमान मंदिर, मिस्किनपुरा चौक, बसस्टँडसमोरील परिसर, गणपती मंदिर, मुख्य रस्ता, हनुमान चौक, गांधी चौक याचा समावेश होतो.
प्रभाग क्रमांक 9
प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेल्यावेळी, 2017 मध्ये काँग्रेसच्या गडात राष्ट्रवादी काँग्रेसने खाते उघडले होते. सपना किसवे, रेहाना बसाळे, अशोक गोविंदपूरकर हे काँग्रेस उमेदवार निवडून आले होते. तर राजा मणियार हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते. भाजपला वा इतर कुणाला या प्रभागात खातं उघडता आलं नाही.
प्रभाग क्रमांक 9 ची एकूण लोकसंख्या 23,045 इतकी आहे. या प्रभागात उस्मानपुरा, सावेवाडी, त्रिमुर्ती नगर, खोरे गल्ली, श्रमसाफल्य सोसायटी, ज्ञानेश्वर नगर, केशव नगर, जफर नगर, अंबाजोगाई रोड, जुना रेणापूर पोलीस चौकी, बालाजी मंदिर, शिवाजी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाची पश्चिम बाजू, जुना एमआयडीसी रोड, टके नगर मस्जिद याचा समावेश आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
