AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Mahapalika Election Result: लातूरमध्ये काँग्रेस-वंचितची मुसंडी, भाजपला प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य भोवलं

Latur Mahapalika Election Result: मराठवाड्यातील तीन महानगरपालिकेत भाजपच्या विजयाचे वारू उधळले आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. अनेक उमेदवार निवडून आले आहे. पण लातूरमध्ये काँग्रेसचा सफाया करण्याचे भाजपचे स्वप्न धुळीस मिळाले.

Latur Mahapalika Election Result: लातूरमध्ये काँग्रेस-वंचितची मुसंडी, भाजपला प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य भोवलं
लातूर महानगरपालिकेत काँग्रेस वंचितची मुसंडीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 16, 2026 | 2:03 PM
Share

Congress-Vanchit Vs BJP: मराठवाड्यातील पाच महानगरपालिका निवडणुकीपैकी परभणी आणि लातूरमध्ये भाजपसाठी अजून साजेसे चित्र दिसत नाही. छत्रपती संभाजीनगरनंतर नवनिर्मित जालना महानगरपालिकेत भाजपच्या विजयाचे वारू उधळले गेले आहे. तर नांदेडमध्ये सुद्धा भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. लातूरमध्ये मोठा करिष्मा करण्याची आणि काँग्रेसचा सफाया करण्याच्या वल्गणा भाजपने केल्या होत्या. तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस औषधालाही नसेल आशा आशयाचे वक्तव्य केले होते. पण माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयीचे ते वक्तव्यच इथं भाजपला भोवल्याचे दिसून येते.

लातूरमध्ये काँग्रेस-वंचितकडे एकहाती सत्ता

लातूरमधून मोठी अपडेट समोर येत आहे. काँग्रेस पक्षाची 37 तर वंचित आघाडी सर्वच पाच जागांवर आघाडीवर असल्याचे समजते. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा काँग्रेस मोठ्या ताकदीने पुढे येत असल्याचे चित्र आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. लातूरमध्ये काँग्रेस-वंचितकडे एकहाती सत्ता जाण्याची स्थिती आहे. तर भाजप 25 जागांच्या जवळपास आघाडीवर असल्याची तुर्तास माहिती मिळत आहे. गेल्यावेळी या महापालिकेत भाजपने मोठा करिष्मा दाखवला होता. भाजपने 37 जागांवर विजय मिळवला होता. पण यंदा हा आकडा गाठताना भाजपची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

काँग्रेसचे चार विजयी उमेदवार

लातूर महापालिकेतील काही निकाल समोर आले आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये वंचितचे अमोल लांडगे, काँग्रेसचे पप्पू देशमुख, कमल सोमवंशी आणि साहीन मणियार या विजयी झाल्या आहेत. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, प्रभाग क्रं. 4, प्रभाग क्रमांकमध्ये 7 आणि 13 मध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तर काही ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. यामुळे निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. पण सध्याच्या आकडेवारीनुसार लातूरमध्ये काँग्रेस-वंचित आघाडीने मोठी मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांचं ते वक्तव्य भोवलं

“लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही.” असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 5 जानेवारी रोजी केले होते. त्यावरून एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समोर येऊन प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्या जाऊ नये, विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही असे सांगावे लागले होते. पण तरीही निकालात त्याचे पडसाद उमटल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...