AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NAM : टीम इंडियाची नवी दिल्लीतील कामगिरी कशी? इतके सामने जिंकलेत

Icc T20i World Cup 2026, India vs Namibia: टीम इंडियाचा टी 20i क्रिकेटमध्ये दबदबा राहिला आहे. मात्र भारताने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आतापर्यंत किती टी 20i सामने जिंकले आहेत? जाणून घ्या.

IND vs NAM : टीम इंडियाची नवी दिल्लीतील कामगिरी कशी? इतके सामने जिंकलेत
Suryakumar Yadav Team India Huddle TalkImage Credit source: @akshar2026 X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 11, 2026 | 8:35 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यूएसएचा पराभव करत विजयाचं खातं उघडलं. मात्र यूएसएने भारताला हा सामना सहजासहजी जिंकू दिला नाही. भारताला हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने हा सामना सुरक्षित अंतराने जिंकला. भारताने यासह टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही ब्रेक केला. आता टीम इंडिया या मोहिमेतील आपला दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.

टीम इंडिया आपला दुसरा सामना हा नवख्या नामिबिया विरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांचा हा दुसरा असणार आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. भारताची या सामन्यानिमित्ताने अरुण जेटली स्टेडियममध्ये कामगिरी कशी राहिली आहे, हे जाणून घेऊयात.

भारताची राजधानी दिल्लीतील कामगिरी

टीम इंडियाने गेल्या टी 20I वर्ल्ड कपनंतर सातत्याने चमकदार कामगिरी केलीय. त्यामुळे भारताचं एकतर्फी वर्चस्व राहिलं आहे. तसेच भारताची दिल्लीतील या स्टेडियममधील कामगिरी समाधानकारक आहे. मात्र भारताची ती आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.भारताने या मैदानात आतापर्यंत 4 टी 20I सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 2 सामने जिंकलेत. तर 2 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय.

भारताची 4 सामन्यांमधील कामगिरी

  • भारताने 2017 साली या मैदानातील आपल्या पहिल्या टी 20I सामन्यात न्यूझीलंडला 53 धावांनी पराभूत केलं होतं.
  • भारताला त्यानंतर 2019 साली या मैदानातील आपल्या दुसऱ्या टी 20I सामन्यात बांगलादेशकडून 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं.
  • भारताला या मैदानातील आपल्या तिसऱ्या टी 20I सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 7 विकेट्सने पराभूत व्हाव लागलेलं.
  • तसेच टीम इंडियाने 2024 साली या मैदानात आपला चौथा आणि अखेरचा टी 20I सामना खेळला होता. भारताने त्या सामन्यात बांगलादेशचा 86 धावांनी धुव्वा उडवत 2019 मधील पराभवाची परतफेड केली होती.

टीम इंडिया नवी दिल्लीत तिसरा टी 20I सामना जिंकण्यासाठी सज्ज

त्यामुळे आता टीम इंडिया 12 फेब्रुवारीला या मैदानातील आपल्या एकूण पाचव्या टी 20I सामन्यात खेळताना तिसरा विजय मिळवणार याची खात्री चाहत्यांना आहे. त्यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात