समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा… व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
मुंबईत शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, समुद्रालाही मोठी भरती आली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

समुद्रात तब्बल 4.33 मीटर उंच लाटा उसळल्याने मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी आणि किनारपट्टी परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असून नागरिक समुद्रकिनारी गर्दी करताना दिसत आहेत. मात्र, पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
लोकल रेल्वे सेवा काही ठिकाणी उशिराने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्यांवर वाहतूक कोंडीही वाढली आहे. हवामान विभागाने मच्छीमारांना पुढील 24 तास समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.
Published on: Jul 04, 2026 04:23 PM
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...