AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी पँटमध्येच… दाऊदचा फोन येताच ललित मोदी घाबरले, नेमकं काय घडलं होतं?

आईपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांना एकदा दाऊदचा फोन आला होता. या फोनमुळे ते इतके घाबरले होते की थेट पँटमध्येच... नेमकं काय घडलं वाचा...

मी पँटमध्येच... दाऊदचा फोन येताच ललित मोदी घाबरले, नेमकं काय घडलं होतं?
Lalit ModiImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 04, 2026 | 5:14 PM
Share

आईपीएलचे संस्थापक आणि माजी क्रिकेट प्रशासक ललित मोदी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित एका जुन्या फोन कॉलचे वर्णन करत मोठा खुलासा केला. एएनआयशी बोलताना ललित मोदी यांनी सांगितले की, जेव्हा दाऊद इब्राहिमकडून त्यांना फोन आला तेव्हा ते इतके घाबरले की त्यांची प्रकृती बिघडली. आता नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या…

ललित मोदींनी एका मुलाखतीमध्ये केला खुलासा

ललित मोदी या मुलाखती म्हणाले की, त्या काळात दाऊद इब्राहिमचे नाव ऐकताच मोठमोठे लोक थरथर कापायचे. जेव्हा त्यांना समजले की दुसऱ्या बाजूला दाऊद इब्राहिम बोलत आहे, तेव्हा ते इतके भयभीत झाले की त्यांच्या तोंडून शब्दही बाहेर फुटत नव्हता. मुलाखतीत त्यांनी सांगितले, “मी इतका घाबरलो होतो की मी पॅंटमध्ये… करून टाकले.” ललित मोदी यांनी स्पष्ट केले की, त्यांचा कोणत्याही प्रकारचा अंडरवर्ल्डशी संबंध कधीही नव्हता. त्यांनी या घटनेला आपल्या जीवनातील सर्वात भयावह अनुभवांपैकी एक म्हटले. मुलाखतीदरम्यान त्यांनी त्या काळातील वातावरण आणि अंडरवर्ल्डच्या भीतीचेही वर्णन केले. ललित मोदी यांचे हे विधान समोर आल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

एएनआयशी बोलताना ललित मोदी (जे मे २०१० पासून भारत सोडून मुख्यतः लंडनमध्ये राहत आहेत) यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. त्यात पळकुटा गँगस्टर दाऊद इब्राहिमकडून मिळालेल्या धमक्यांचाही समावेश होता. मोदी यांनी आपल्या कार्यकाळात फिक्सिंगचा कोणताही वाद आला नसल्यावर भर दिली. ते म्हणाले, “आयपीएल कमिशनर आणि चेअरमन म्हणून माझ्या तीन वर्षांच्या कार्यकाळात तुम्ही एकही अशी घटना ऐकली नसेल, आणि माझ्या काळात मैच-फिक्सिंगची कोणतीही चौकशी झाली नाही.”

मॅच फिक्सिंगसाठी करोडो डॉलरची ऑफर

त्यांनी आरोप केला की, दाऊदच्या नेटवर्कने त्यांना निशाणा बनवले कारण त्यांनी आयपीएलच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये मैच-फिक्सिंगला परवानगी देण्यास नकार दिला होता. मोदी यांनी दावा केला की, मॅचमध्ये हेरफेर करण्याच्या प्रयत्नांना दुर्लक्ष करण्यासाठी त्यांना “करोडो डॉलर्स”ची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर नाकारल्यानंतर दाऊदच्या इशाऱ्यावर त्यांच्यावर तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले. या हल्ल्यात ते थोडक्यात वाचले.

ललित मोदी पुढे म्हणाले, “त्याने माझ्यावर तीन वेळा हल्ला केला. ही गोष्ट दाऊदने स्वतः सांगितली होती. तिन्ही वेळा तो चुकला.” त्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मॅचमध्ये बदल करण्यासाठी दाऊदने संपर्क केला तेव्हा त्यांनी थेट नकार दिला. त्यामुळे गुन्हेगारी टोळी नाराज झाली. ललित मोदी यांच्या नेतृत्वात आयपीएलचे पहिले तीन सीझन फिक्सिंगमुक्त राहिले. याच भूमिकेमुळे त्यांचा सट्टेबाजी आणि अंडरवर्ल्डच्या शक्तिशाली लोकांशी वाद झाला.

ललित मोदी यांनी पुढे आरोप केला की, हा संघर्ष २००९च्या सीझनमध्ये अधिक तीव्र झाला, जेव्हा त्यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल यशस्वीरित्या दक्षिण आफ्रिकेत हलवली. सट्टेबाज टोळ्यांनी भारतातच स्पर्धा होईल या धारणेवर पैसे लावले होते. जेव्हा स्पर्धा यशस्वी झाली, तेव्हा ज्यांचे पैसे बुडणार होते, ते कथितरित्या मोदींच्या विरोधात गेले.

आयपीएलचे माजी प्रमुख म्हणाले की, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना या धमक्यांची माहिती होती. मुंबई पोलिसांनी या संभाषणाची रेकॉर्डिंग केली होती आणि नंतर त्यांना Z-श्रेणीची सुरक्षा देण्यात आली. मोदी यांनी आरोप केला की, त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला होता आणि दक्षिण आफ्रिका व मोंटेनेग्रोमध्ये त्यांना निशाणा बनवण्याच्या वेगवेगळ्या कटांचाही पर्दाफाश झाला होता.

Follow Us
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?
मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच
Viral Video | मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच पाणी
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा व्हिडीओ
फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
Devendra Fadnavis | 6 तारखेपर्यंत धोका! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
आणखी एका नेत्याची जीभ घसरली, थेट म्हणाले, रस्त्यावर उतरूनकाय उXXX...
आणखी एका नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, रस्त्यावर उतरून तुम्ही काय उXXX...