AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Election Results 2026 LIVE: लातूरमधील राजकीय खेला कुणाच्या पथ्यावर? आजचा कौल कुणाच्या पदरात, एका क्लिकवर जाणून घ्या

Latur Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: लातूरमधील राजकीय सत्ता समीकरणं पालटली आहे. निष्ठावंत आघाडीने अनेकांच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होईल. तर अनेक ठिकाणी चौरंगी लढत होणार हे निश्चित होते. आज अपक्ष आणि सत्ताधारी कुणाच्या पदरात मतदार कौल टाकतात हे निकालातून समोर येईल.

Latur Election Results 2026 LIVE: लातूरमधील राजकीय खेला कुणाच्या पथ्यावर? आजचा कौल कुणाच्या पदरात, एका क्लिकवर जाणून घ्या
लातूर महापालिका निवडणूक निकालImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:27 AM
Share

लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. गेल्या दहा दिवसात मोठी उलथापालथ झाली. 70 जागांसाठी 359 उमेदवार रिंगणात उतरलेले होते. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांनी या निवडणुकीत जोर बैठका लावल्या. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली होती. या दहा दिवसात प्रचाराला चांगलीच धार आली होती. एकमेकांवर दोन्ही बाजूंनी तुफान शा‍ब्दिक हल्ले झाले होते. तर दुसरीकडे निष्ठावंत आघाडीची या प्रचारात मोठी चर्चा सुरू होती. कालच्या मतदारानंतर कुणाची हवा आहे, याची चर्चा सुरू झाली. आता अवघ्या काही वेळात कोणी बाजी मारली हे समोर येणार आहे.

2017 मध्ये लातूर महापालिकेत 32 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. तर 36 जागांवर भाजपचे कमळ फुलले होते. तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला होता.यंदा कुणाच्या पारड्यात मतदार कौल देणार? हे आज समोर येईल.लातूर महानगरपालिकेत चार सदस्य असलेल्या प्रभागांची संख्या 16 इतकी आहे. तर तीन सदस्यांची संख्या 02 इतकी आहे. लातूर शहरासाठी एकूण 18 प्रभाग आहेत. या प्रभागात एकूण 70 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. या पालिकेत तिरंगी निवडणूक होणार आहे.

प्रभाग क्रमांक 13

गेल्यावेळी प्रभाग क्रमांक 13 मध्ये 4 उमेदवार होते. याप्रभागात गेल्यावेळी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले होते. 2017 मध्ये योजना खामेगावकर, अयुब मणियार, कमल सोमवंशी, बाळासाहेब देशमुख हे विजयी झाले होते. या प्रभागात आता कोण बाजी मारणार याची चर्चा सुरू आहे.

प्रभाग 13 मध्ये एकूण 21,843 इतकी लोकसंख्या आहे. या प्रभागात प्रकाश नगर, संभाजी नगर, दयानंद कॉलेज परिसर, क्रांती नगर, सैनिक पुरी, कपील नगर, रेल्वे लाईन रस्ता, मटन मार्केट भाग, मंगलमूर्ती अपार्टमेंट, खाडगाव रोड, रिंगरोड, पुढे बार्शी रोडचा परिसर यामध्ये समावेश आहे.

प्रभाग क्रमांकविजयी उमेदवारपक्ष

प्रभाग क्रमांक 14

प्रभाग क्रमांक 14 मध्ये गेल्यावेळी 2017 मध्ये भाजपचा वरचष्मा होता. या प्रभागात भाजपचे तीन उमेदवार निवडून आले होते. काँग्रेसला या प्रभागात एक जागेवर खातं उघडता आलं. नितीश वाघमारे, कोमल वायचळकर, स्वाती जवालगे हे तीन भाजपचे नगरसेवक जिंकले. तर रविशंकर जाधव हे काँग्रेसचे तिकीटावर निवडून आले होते.

प्रभाग क्रमांक 14 ची एकूण लोकसंख्या 21,742 इतकी आहे. या प्रभागात लक्ष्मी कॉलनी, सरस्वती कॉलनी, कालिका देवी मंदिर परिसर, वैभव नगर, सौभाग्य नगर, विजय कॉलनी, एसटी डेपो परिसर, शिवाजी चौकच्या जवळचा परिसर, सावित्रीबाई फुले, रिंग रोडसह खाडगाव रोडचा भाग यामध्ये येतो.

प्रभाग क्रमांक 15

प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्यावेळी, 2017 मध्ये भाजपने मुसंडी मारली होती. भाजपचेच उमेदवार निवडून आले. या प्रभागात काँग्रेस वा इतर पक्षांना खातं उघडता आलं नाही. या प्रभागात भाजपचे दीपक मठपती, वर्षा कुलकर्णी, श्वेता लोंढे, संगीत रेंदाळे हे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक 15 ची एकूण लोकसंख्या 21,623 इतकी आहे. या प्रभागात सिग्नल कॅम्प, शिवाजी नगर, रामनगर, सिताराम नगर, नारायण नगर, आदर्श कॉलनी, गुणगुणे नगर, देशपांडे कॉलनी, विश्वेश्वरैय्या कॉलनी, डीसीसी बँक, मिनी मार्केटचा परिसर, ठाकरे चौक, बोधे चौक, कान्हेरी लमान तांडा, रिंग रोड, नाईक चौक, राजीव गांधी चौक, जुना औसा रोड, महाराष्ट्र ग्रामीण बँक, लक्ष्मी निवास असा मोठा परिसर या प्रभागात येतो.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

लातूर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!
Sunil Tatkare | शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!
भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने...
भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने नाशकात संघर्ष अटळ!
ठाकरेंच्या सेनेला दुसरा मोठा दणका! आणखी एका नेत्याचा उमेदवारी अर्ज माग
ठाकरेंच्या सेनेला दुसरा मोठा दणका! आणखी एका नेत्याचा उमेदवारी अर्ज मागे, 15 मिनिटांत झाला मोठा गेम!
उमेदवारी मागे घेताच ठाकरेंचा दणका; बाळ मानेंची ठाकरे सेनेतून हकालपट्टी
मोठी बातमी! उमेदवारी मागे घेताच उद्धव ठाकरेंचा दणका; बाळ माने यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी
भाजपवर हल्लाबोल अन्.... सत्तारांच्या त्या वक्तव्याने महायुतीत खळबळ
Vidhan Parishad Election | भाजपवर हल्लाबोल अन् आता मंत्रीपदावर दावा; सत्तारांच्या त्या वक्तव्याने महायुतीत पुन्हा खळबळ
कोकणात ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका! गळाभेट, जिल्हाधीकारी कार्यालय अन्
कोकणात ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका! गळाभेट, जिल्हाधीकारी कार्यालय अन् नितेश राणेंनी टप्प्यात केला कार्यक्रम
महागाईने जनतेचं कंबरडचं मोडलं; सेनेने रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं!
Shivsena Thackeray Protest | महागाईने जनतेचं कंबरडचं मोडलं; ठाकरेंच्या सेनेने रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं!
पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील; राहुल गांधींचा
पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील; राहुल गांधींचा खळबळजनक दावा
आला रे आला... आता ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होणार....
आला रे आला... आता ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होणार... छत्र्या, रेनकोट काढून ठेवा; मान्सून अखेर केरळात
शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही... गुलाबराव पाटलांनी नराजीच्या सुरात
शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही... गुलाबराव पाटलांनी नराजीच्या सुरात सगळंच सांगितलं