AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, महापालिका निवडणुकीचं गणितच बदलणार, सर्वात मोठी बातमी समोर

मोठी बातमी समोर येत आहे, महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून, शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे.

शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, महापालिका निवडणुकीचं गणितच बदलणार, सर्वात मोठी बातमी समोर
Eknath ShindeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 08, 2026 | 3:23 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, जशी-जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे, तशी-तशी प्रचारात देखील रंगत आल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून सभांचा धडाका सुरू झाला आहे, तर दुसरीकडे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पहयाला मिळत आहे.  एकीकडे सभा आणि बैठकांमधून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे, प्रत्येक पक्षांकडून मतदारांसमोर आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न होत आहे, तर दुसरीकडे पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटात मोठा पक्ष प्रवेश होणार आहे.

आधी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पहायला मिळालं होतं, आपल्या पक्षाकडून तिकीट मिळणार नसल्याचं दिसताच अनेक इच्छुकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता, सर्वात जास्त इनकमिंग त्यावेळी भाजपात झालं होतं, याचा मोठा फटका हा महाविकास आघाडीला तर बसलाच होता, सोबतच शिवसेना शिंदे गटाला देखील बसला होता, त्यावरून त्यावेळी शिवसेना शिंदे गटानं नाराजी देखील व्यक्त केली होती.

दरम्यान यावेळी मात्र राजकीय समिकरणं बदलली आहेत, महापालिका निवडणुकीसाठी भाजपने अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील पक्षप्रवेश सुरूच असून, आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  लातूर जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि  माजी नगरसेवक तसेच माजी विरोधी पक्षनेते  कुलदीपसिंग ठाकूर यांनी मोठा निर्णय घेतला आहे, ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्य 38 पदाधिकाऱ्यांचा देखील  एकत्रित पक्षप्रवेश होणार आहे, त्यामुळे आता लातूर महानगर पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी