AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Saroj : विजयादरम्यान मी…, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भावी पती रिंकूसाठी प्रिया सरोजकडून खास पोस्ट

Priya Saroj X Post For Rinku Singh Icc T20I World Cup 2026 : खासदार प्रिया सरोज यांनी टीम इंडियाचं सोशल मीडिया पोस्टद्वारे टी 20i वर्ल्ड कप विजयासाठी अभिनंदन केलंय. तसेच रिंकूच्या धैर्याला सलाम केला आहे. जाणून घ्या.

Priya Saroj : विजयादरम्यान मी..., वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भावी पती रिंकूसाठी प्रिया सरोजकडून खास पोस्ट
Priya Saroj X Post For Rinku SinghImage Credit source: Ani and @PriyaSarojMP X Account
| Updated on: Mar 09, 2026 | 11:30 PM
Share

टीम इंडिया आणि क्रिकेट चाहत्यांसाठी 8 मार्च ही तारीख अविस्मरणीय ठरली. भारताने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून इतिहास घडवला. भारताने या स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. भारताने 96 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आणि वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंचे कुटुंबिय आणि नातेवाईक मैदानात आले आणि एकच जल्लोष केला.

तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा फिनिशिर रिंकु सिंह एकटाच खांद्यावर तिरंगा घेऊन दिसला. रिंकूच्या चेहऱ्यावर या विजयाचा आनंद तर होता. मात्र हा ऐतिहासिक विजय पाहण्यासाठी आपले वडील हयात नाहीत ही खंतही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. रिंकूचे वडील खानचंद्र सिंह यांचं 27 फेब्रुवारीला निधन झालं. त्यामुळे सिंह कुटुंबिय दु:खात आहेत. त्यामुळे वर्ल्ड कप विजयावेळी रिंकूच मनोबल वाढवण्यासाठी त्याची भावी पत्नी आणि खासदार प्रिया सरोज तिथे असायला हव्या होत्या, असं नेटकऱ्यांनी बोलून दाखवलं. त्यानंतर आता या विजयाच्या जवळपास 20 तासांनतर प्रिया सरोज यांनी भारताच्या विजयासाठी एक सविस्तर पोस्ट केली आहे.

प्रिया सरोज यांची पोस्ट, काय म्हटलं?

प्रिया सरोज यांनी एक्स पोस्टमध्ये रिंकूचे वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतचे 2 फोटो शेअर केले आहेत. तसेच या पोस्टमध्ये भारताच्या विजयाचा आणि रिंकूच्या धैर्याचा उल्लेख केला आहे.

भारताने 8 मार्चला वर्ल्ड कप जिंकला. या तारखेची इतिहासात नोंद केली जाईल.या विजयामुळे प्रत्येक देशवासियाची छाती अभिमानाने भरुन आली आहे. हा क्षण येत्या पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवला जाईल, असं प्रिया सरोज यांनी आपल्या पोस्टमध्ये भारताच्या विजयाबाबत नमूद केलं आहे

रिंकूसाठी पोस्टमध्ये काय म्हटंल?

“मी भारताच्या या ऐतिहासिक विजयादरम्यान एका मुलाची ताकद पाहिली जो देशासाठी, संघासाठी आणि त्याच्या वडिलांसाठी खंबीरपणे उभा राहिला. आयुष्यात अशा अवघड प्रसंगी मैदानात उतरुन विजेता होणं हे खरंच धाडसीपणाचं लक्षण आहे”, असं प्रिया सरोज यांनी रिंकूला उद्देशून म्हटलं आहे. तसेच प्रिया सरोज यांनी या ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाचं आणि रिंकूचं अभिनंदनही केलं.

नेटकऱ्यांचा प्रिया सरोज यांच्यावर निशाणा

दरम्यान नेटकऱ्यांनी प्रिया सरोज यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्ल्ड कप विजयाच्या अनेक तासांनंतर अभिनंदन करणारी पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी प्रिया सरोज यांच्यावर टीका केली आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार