AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक जिंकले पण नियम विसरले, शिंदे गटाच्या अडचणी वाढणार? व्हिडीओ व्हायरल

निवडणूक जिंकले पण नियम विसरले, शिंदे गटाच्या अडचणी वाढणार? व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jan 18, 2026 | 3:38 PM
Share

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या विजय मिरवणुकीत पालकमंत्र्यांच्या कन्येने तलवार फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, या प्रकरणी एका उमेदवारावर गुन्हा दाखल झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. या निकालानंतर आता शहरात ठिकठिकाणी विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मात्र या जल्लोषाला गालबोट लावणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सत्ताधारी शिवसेना शिंदेच्या उमेदवारांनी आणि खुद्द पालकमंत्र्यांच्या कन्येने भररस्त्यात तलवारी नाचवत कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी आता पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं प्रकरण काय?

महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विजय मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गुलाल उधळत असतानाच आनंदाच्या भरात नवनिर्वाचित उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी हातात उघडपणे तलवारी घेतल्या. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट या देखील या मिरवणुकीत सहभागी होत्या. या व्हायरल व्हिडिओमध्ये हर्षदा शिरसाट, राजू राजपूत आणि अभिजीत जीवनवाल हे उघडपणे तलवारी नाचवताना दिसत आहेत.

Live

Municipal Election 2026

09:12 PM

आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले

07:54 PM

उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश  

07:36 PM

नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार

07:31 PM

भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

या प्रकरणाची दखल घेत वेदांतनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत नवनिर्वाचित उमेदवार अभिजीत जीवनवाल यांच्यावर शस्त्र कायद्यान्वये (Arms Act) गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे आणि त्याचे प्रदर्शन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्याच अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या मिरवणुकीत आणि व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या हर्षदा शिरसाट आणि इतर पदाधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नाही.

आता याप्रकरणी एकाच घटनेत सहभागी असलेल्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो, मग पालकमंत्र्यांच्या मुलीवर पोलीस कारवाई करणार का? असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे नातेवाईकच जर कायद्याचे धिंडवडे काढत असतील, तर पोलिसांनी कोणाचेही दडपण न घेता कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून आणि नागरिकांकडून होत आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आता या प्रकरणी पुढे काय पाऊल उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Published on: Jan 18, 2026 03:33 PM