AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : टी 20i वर्ल्ड कप फायनलनंतर टीममधून 8 जणांचा पत्ता कट, रविवारपासून टी 20i मालिकेचा थरार

T20i Series : न्यूझीलंडला टीम इंडिया विरुद्ध टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध्या मालिकेसाठी वर्ल्ड कप संघात असणाऱ्या एकूण पैकी 8 खेळाडूंना बाहेर केलं आहे.

Cricket : टी 20i वर्ल्ड कप फायनलनंतर टीममधून 8 जणांचा पत्ता कट, रविवारपासून टी 20i मालिकेचा थरार
India vs New Zealand Suryakumar Yadav and Mitchell SantnerImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 15, 2026 | 4:18 AM
Share

टीम इंडियाने रविवारी 8 मार्च रोजी इतिहास घडवला. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर नाव कोरलं. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. भारताने या सामन्यात न्यूझीलंडला 96 धावांनी लोळवलं. टीम इंडियाने या विजयासह एकूण तिसरा तर सलग दुसरा टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. तसेच इंडिया गतविजेता म्हणून मायदेशात वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच टीम ठरली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकून पुन्हा एकदा क्रिकेट विश्वाला आपली ताकद दाखवून दिली. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचं आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. न्यूझीलंडला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 फायलनंतर आता टीम इंडिया थेट जून महिन्यात आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावणारी न्यूझीलंड रविवार 15 मार्चपासून द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंड मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हात करणार आहे. दोन्ही संघ टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यानंतर आमनेसामने असणार आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी वर्ल्ड कप संघातील 8 खेळाडूंना बाहेर केलं आहे. या 8 खेळाडूंमध्ये कोण कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

8 खेळाडू आऊट

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत संधी न देता 8 खेळाडूंना विश्रांती दिली आहे. या 8 खेळाडूंमध्ये जेकब डफी, मॅट हेन्री, डॅरेल मिचेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलीप्स, रचीन रवींद्र, फिन एलन आणि टीम सायफर्ट यांचा समावेश आहे. हे 8 खेळाडू टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा भाग होते. तसेच यापैकी बहुतांश खेळाडू हे आगामी आयपीएलच्या स्पर्धेच्या 19 व्या मोसमात खेळणार आहे. या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

तिघांना पहिल्यांदाच संधी

तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेसाठी निवड समितीने पहिल्यांदाच 3 खेळाडूंना संधी दिली आहे. निक केली, जेडन लेनॉक्स आणि केटन क्लार्क अशी यांची नावं आहेत. त्यामुळे या तिघांचं या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टी 20i पदार्पणाची संधी मिळते का? याकडे लक्ष असणार आहे.

पहिला सामना किती वाजता?

दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20I सामना बे ओव्हल, माउंट मौंगानुई इथे आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी