AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं! महापौर एकनाथ शिंदेंचाच, फडणवीसांना अचानक सर्वात मोठा धक्का; ऐनवेळी मोठा गेम!

एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी मोठे राजकीय डावपेच टाकले आहेत. त्यांच्या या खेळीमुळे आता शिवसेनेचा महापौर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठरलं! महापौर एकनाथ शिंदेंचाच, फडणवीसांना अचानक सर्वात मोठा धक्का; ऐनवेळी मोठा गेम!
eknath shinde and devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 17, 2026 | 9:20 PM
Share

Ulhasnagar Municipal Corporation Election Result : राज्यात 29 महापालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागला. या निवडणुकीत बहुसंख्य महापालिकांत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबईत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीचा महापौर बसणार आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे येथे या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती. आता तिथेही महपौरपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. असे असतानाच आता एका महानगरपालिकेत मात्र एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी राजकीय चाल खेळली आहे. त्यांच्या या डावपेचामुळे भाजपा एकदम चितपट झाली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या डावपेचामुळे आता या महापालिकेत थेट शिवसेनेचा महापौर विराजमान होणार आहे. भाजपासाठी हा चांगलाच धक्का असल्याचे बोलले जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर महापालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. येथे एकूण 78 जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपाला एकूण 37 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे काहीही झाले तरी येथे भाजपाचाच महापौर बसेल, असे सांगितले जात होते. परंतु श्रीकांत शिंदे यांनी ऐनवेळी सूत्र हाती घेत मोठ्या घडामोडी घडवून आणल्या आहेत. उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची संख्या 38 वर गेली आहे. दुसरीकडे भाजपाचे संख्याबळ शिवसेनेपेक्षा एक उमेदवार कमी म्हणजेच 37 वर आले आले आहे. सविता तोरणे यांचा शिवसेना प्रवेश हा उल्हासनगरमध्ये गेमचेंजर ठरला आहे. तोरणे यांच्या पक्षप्रवेशासह तिथे शिवसेना वंचितचे दोन्ही उमेदवार सोबतघेऊन सत्तेत बसणार आहे. तिथे शिवसेनेचाच महापौर होणार, असे सांगितले जात आहे.

Live

Municipal Election 2026

09:12 PM

आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले

07:54 PM

उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश  

07:36 PM

नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार

07:31 PM

भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

नेमकं काय होणार?

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी ऐनवेळी सविता तोरणे यांना पक्षात घेतल्याने सगळेच गणित बदलले आहे. आकडेच बदलल्याने भाजपाचा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल
रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल.
आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद
आमचे 54 नगरसेवक फोडले तरीही 65 नगरसेवक जिंकले, हीच शिवसेनेची खरी ताकद.
शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
शिंदेनी हॉटेलमध्ये नगसेवक का ठेवले? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा
“तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच”किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा.
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर.
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी
बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी.
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत
मुंबईचा महापौर हा... भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत.
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल.
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'.
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट.