AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची लागली मोठी वाट… ज्या गोष्टीची प्रचंड भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव प्रचंड वाढला. मोठे युद्ध पेटले आहे. या युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. काही देशांनी थेट अमेरिकेला या युद्धात पाठिंबा दिला तर काहींनी तटस्थ भूमिका घेतली.

पाकिस्तानची लागली मोठी वाट... ज्या गोष्टीची प्रचंड भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट..
pakistan and america
| Updated on: Mar 04, 2026 | 8:09 AM
Share

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. तीन देशांमध्ये मोठे युद्ध पेटले आहे. मात्र, या युद्धाचा परिणाम फक्त या तीन देशांपुरता मर्यादित राहिला नाही तर या युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. कच्चे तेल आयात होणे जवळपास देशांमध्ये सध्याच्या स्थितीला बंद झाले. भविष्यात तेलाची मोठी कमी जाणू शकते. शिवाय दुबई विमानतळाची सेवा विस्कळीत झाली. इराणने दुबईच्या विमानतळाला टार्गेट केले. मोठे हल्ले केले जात आहेत. इराणकडून ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे मोठे हल्ले केले जात आहेत. यासोबतच इस्त्रायलमध्येही मोठे धमाके सतत होत आहेत, लोक बंकरमध्ये लपून बसले. या युद्धात जर सर्वात जास्त नुकसान कोणाचे झाले असेल तर ते नक्कीच इराण आहे. इराणच्या प्रमुख शहरांवर मोठे हल्ले केले जात आहेत. यासोबतच सरकारी इमारती टार्गेटवर आहेत. हे युद्ध चार ते पाच आठवडे राहण्याची शक्यता आहे. यासोबतच इराणकडून महत्वाचा सागरी मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सर्वच देशांची कोंडी झाली.

इराणच्या मुख्य कमांडर सेंटरवर मोठा मिसाईल हल्ला करण्यात आला. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असे इराणकडून वारंवार सांगितले जात आहे. आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने ठार केले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर जगातील अनेक देशांमध्ये लोक थेट रस्त्यावर आले आणि अमेरिकेचा आणि इस्त्रायलचा निषेध केला.

पाकिस्तानातील प्रमुख शहरांमध्ये असलेल्या पाकिस्तान दूतावास कार्यालयाला टार्गेट करत जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. यानंतर अमेरिकेने थेट मोठा निर्णय घेत पाकिस्तानातील व्हिसा सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यानच आता पाकिस्तानला मोठा दणका अमेरिकेकडून दिला जात आहे.

अमेरिकेच्या दूतावासावर होणाऱ्या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानातील पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यु झाला. शहबाज शरीफ आणि जनरल असीम मुनीर यांच्यावर प्रचंड दबाव आहे. यासोबतच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी बोर्ड ऑफ पीसमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...