AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत’, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा खळबळजनक दावा, म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या…

Bhagatsingh Koshyari on Raj Thackeray: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये खळबळजनक वक्तव्य केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तच घाबरलेत असा दावा त्यांनी केला. या दाव्याने नवीन वादाला फोडणी बसली आहे. काय म्हणाले भगतसिंग कोश्यारी?

'राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत', माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा खळबळजनक दावा, म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या...
नरेंद्र मोदी, राज ठाकरे, भगतसिंह कोश्यारीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 11, 2026 | 11:28 AM
Share

Bhagatsingh Koshyari on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांना भाषिक मुद्दावरून चांगलेच घेरले. रटाळ प्रवचनाच्या राजकीय टीका टिप्पणी करू नका असे राज ठाकरे यांनी त्यांना सुनावले होते. त्यानंतर लागलीच त्यावर भाजपच्या गोटातून सणसणीत प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत असा खळबळजनक दावा माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. या खळबळजनक दाव्याने नवीन वादाला फोडणी बसली आहे. तर मोदींना इतकी घाबरण्याची गरज नसल्याचा चिमटाही त्यांनी राज ठाकरे यांना काढला. काय म्हणाले कोश्यारी?

राज ठाकरे हे मोदींना जास्तच घाबरलेत

वरळी डोम येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकारांनी आणि इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. लोक घाबरून अशा रटाळ प्रवचनांना येतात असा टोला त्यांनी लगावला. सत्ता गेल्यानंतर हे लोक येथील का असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. भाजपमधून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता होतीच. ती कमी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भरून काढली.

जी लोक संघाच्या कार्यक्रमाला आली ती सर्व लोक नरेंद्र मोदींना घाबरली नसतील. मी राज ठाकरेंचा खूप सन्मान करतो. मात्र मला वाटतं ते नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत. मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा. जसे प्रभू श्रीरामाला सर्व समान होते तसेच नरेंद्र मोदींना देखील सर्वांना समान आहेत, असा सल्ला भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना दिला. नरेंद्र मोदींना घाबरू नका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमित तुम्ही आहात तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. घाबरायचं असेल तर चुकीच्या कामांना घाबरा, असा टोलाही कोश्यारी यांनी बोलता बोलता लगावला.

मी अजितदादांना कधीच विसरणार नाही

आमदार रोहित पवार यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांचा विमान अघात नाही तर शंभर टक्के घातपात असल्याचा आरोप केला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार एक मोठे नेते होते. राज्यात माझ्यावर अनेकदा टीका झाली. मला दूषणं देण्यात आली. पण अजितदादांनी माझ्यावर कधीच टीका केली नाही. माझ्या कधीही ते विरोधात बोलले नाहीत. मी अजित दादा यांना कधीच विसरणार नाही असे कोश्यारी म्हणाले. तर रोहित पवार यांना घातपाताबाबत तसं वाटत असेल तर त्यांनी सरकारकडे चौकशीची मागणी करावी असा सल्लाही कोश्यारी यांनी दिला.

नाशिकमध्ये कॉरिडॉर व्हावा

40 वर्षांपूर्वी देखील मी नाशिकमध्ये आलो होतो. त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे आलो होतो. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मी देखील आज एक भक्त म्हणून आलो आहे. राज्यपाल असताना देखील मी नाशिकमध्ये आलो होतो अशी आठवण भगतसिंह कोश्यारी यांनी जगावल्या. तर जसा अयोध्येत कॉरिडॉर झाला, तसा इथे देखील झाला पाहिजे अशी मोठी मागणीही त्यांनी केली.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...