AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate Today 11 February 2026 : सोन्या-चांदीचा जोरदार बाऊन्स बॅक ! 10 ग्रॅम सोन्याची किंमत ऐकाल तर…

Gold-Silver Rate Today 11 February 2026Latest News Updates in Marathi : गेल्या काही काळपासून झालेल्या घसरणीनंतर, सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. एमसीएक्सवर सोन्याने दीड लाखांचा टप्पा पुन्हा पार केला असून आता 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोन्यासाठी 1,58,436 रुपये मोजावे लागणार आहे. तर चांदीच्या किंमतीत जवळपास 8 हजार..

Gold-Silver Rate Today 11 February 2026 : सोन्या-चांदीचा जोरदार बाऊन्स बॅक ! 10 ग्रॅम सोन्याची किंमत ऐकाल तर...
सोनं-चांदीचे भाव किती ?
| Updated on: Feb 11, 2026 | 11:23 AM
Share

Gold Silver Rate Today : गेल्या काही काळापासून सोनं-चांदी यांच्या किंमतीत सतत घसरण दिसून येत आहे. मात्र बुधवारी हा ट्रेंड मोडीत काढत कमॉडिटी मार्केटमध्ये सोनं-चांदीची पुनर्वापसी झाली. त्यामुळे दोन्ही धातूंच्या किमंतीत जोरदार उसळी पहायला मिळाली. मजबूत जागतिक संकेत आणि स्पॉट मार्केटमध्ये वाढत्या खरेदीमुळे एमसीएक्सवरील सोन्याच्या किमती जवळजवळ 1 टक्क्यांनी वाढल्या. अमेरिकन बाँड उत्पन्नात घट आणि डॉलर कमकुवत झाल्यामुळे मौल्यवान धातूंच्या सुरक्षित मागणीत वाढ झाली. तसेच चांदीची चमकही पुन्हा आली असून आज हाँ धातू 8 हजार रुपयांपर्यंत महाग झाला आहे.

MCXवर, एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 1600 रुपयांपेक्षा जास्त वाढून प्रति 10 ग्रॅमसाठी 1,58,436 रुपये झाला. तर मार्चसाठी चांदीचा भाव 2.6 टक्क्यांनी वाढून 2,59,053 रुपये प्रति किलो झाला. नंतर, त्या किमतीत आणखी वाढ झाली आणि ती प्रति किलो 260,557 या उच्चांकावर पोहोचली. 11 फेब्रुवारी रोजी सुरुवातीच्या व्यवहारात चांदीचा भाव 8009 रुपयांपर्यंत वाढला.

आंतरराष्ट्रीय आणि रिटेल मार्केटची परिस्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी दिसून आली. स्पॉट सिल्व्हर 2.2 टक्क्यांनी वाढून 82.43 प्रति औंस झाला, तर स्पॉट सोन्याचा भाव 0.5 टक्क्यांनी वाढून 5,049.59 डॉलर प्रति औंस झाला. अमेरिकन गोल्ड फ्यूचर्समध्येही जवळपास 1 टक्क्यांनी वाढ झाली.

रिटेलमध्येही सोने आणि चांदीच्या किमतीही वाढल्या. 11 फेब्रुवारी रोजी, 24 कॅरेट सोने 1300 ने नाढून प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 58, 100 रुपयांवर पोहोचलं. तर चांदीचा भाव7,930 रुपयांनी वाढून 2,61,220 रुपये प्रति किलो झाला.

का वाढले भाव ?

– अमेरिकन ट्रेझरी बाँड उत्पन्नात घट झाल्यामुळे बुलियन मार्केटमधील तेजी वाढली.

– अमेरिकन अर्थव्यवस्था मंदावत आहे असं डिसेंबरच्या किरकोळ विक्रीच्या आकडेवारीवरून दिसून आलं.

– फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करेल अशी गुंतवणूकदारांना आशा आहे.

– या कमी उत्पन्नाच्या वातावरणात, सोने आणि चांदीसारख्या नॉन-यिल्ड मालमत्ता अधिक आकर्षक होत आहेत.

– तसेच, डॉलर निर्देशांक 0.15 टक्क्यांनी घसरून 96.66 वर आला, ज्यामुळे इतर चलनांमध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी सोने आणि चांदी स्वस्त झाली.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?