Hero Flex Fuel Bike: 20 रु. लिटर स्वस्त पेट्रोलची कमाल! हिरोच्या 2 गाड्यांनी घातला धुमाकूळ, अवघ्या 2 महिन्यात…
भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपन हीरो मोटोकॉर्पची नवीन फ्लेक्स-फ्युएल बाईकला तुफान प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शिपिंग सुरु झाल्यापासून या बाईकने मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन महिन्यांतच त्यांनी जवळपास १५,००० फ्लेक्स-फ्युएल बाईक्स डीलरशिप्सना वितरित केल्या आहेत

Hero Flex Fuel Bike: भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपन हीरो मोटोकॉर्पची नवीन फ्लेक्स-फ्युएल बाईकला तुफान प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शिपिंग सुरु झाल्यापासून या बाईकने मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन महिन्यांतच त्यांनी जवळपास 15,000 फ्लेक्स-फ्युएल बाईक्स डीलरशिप्सना वितरित केल्या आहेत. काय आहेत या बाईकची खासियत? जाणून घ्या…
हिरोच्या गाडीची हवा, 2 महिन्यात 15,000 विक्री!
हीरोने जून २०मध्ये स्प्लेंडर+ फ्लेक्स आणि एचएफ डिलक्स फ्लेक्स बाईक सादर केली होती. विशेष म्हणजे, ज्या प्रदेशांमध्ये सध्या उच्च-इथेनॉल मिश्रित इंधन उपलब्ध नाही, तिथेही या बाईक्स विकल्या जात आहेत. हीरो मोटोकॉर्पचे सीईओ हर्षवर्धन चितळे यांनी आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांच्या घोषणेदरम्यान यावर सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, कंपनी सध्या नियंत्रित लॉन्चचा भाग म्हणून देशभरातील निवडक डीलरशिप्समार्फत या बाईक्स विकत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे या बाईक्स E85 इंधनावर चालण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, परंतु सध्या देशभरात E85 पेट्रोल उपलब्ध नाही.
E20 पेट्रोलच्या बाजारपेठेतही फ्लेक्स-फ्यूएल बाईक्स का खरेदी करत आहेत?
सीईओ हर्षवर्धन चितळे यांच्या मते, ज्या शहरांमध्ये किंवा भागांमध्ये सध्या फक्त स्टँडर्ड E20 पेट्रोल उपलब्ध आहे, तेथील ग्राहकसुद्धा फ्लेक्स-फ्यूएल बाईक्स खरेदी करत आहेत. ते याला भविष्यासाठी एक सुरक्षित पर्याय मानतात. त्यांचा विश्वास आहे की, भविष्यात जेव्हा बाजारात इथेनॉल मिश्रित इंधन उपलब्ध होईल, तेव्हा ते कोणत्याही त्रासाशिवाय आपल्या बाईक्सवर त्याचा वापर करू शकतील.
गाड्यांची किंमत नेमकी किती?
हिरोच्या दोन्ही मोटरसायकल्स E20 ते E85 पर्यंतच्या इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवर सहज चालू शकतात. कंपनीने त्यांच्या इंजिन ट्युनिंगमध्येही बदल केले आहेत, ज्यामुळे E85 इंधनावर चालवताना या बाईक्सना थोडी जास्त पॉवर मिळते. दोन्ही बाईक्सची इंजिने 8.6 hp आणि 8.3 Nm टॉर्क निर्माण करतात, तर नियमित E20 मॉडेल्स 8.02 bhp आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करतात. किंमत: स्प्लेंडर प्लस फ्लेक्स 82,710 च्या सुरुवातीच्या किमतीत आणि एचएफ डिलक्स फ्लेक्स 72,792 किंमतीत मध्ये लॉन्च करण्यात आली.
दरम्यान,भारतासोबतच, हिरो मोटोकॉर्प आता परदेशी बाजारपेठांवरही लक्ष ठेवून आहे. कंपनी ब्राझीलमध्ये आपला व्यवसाय विस्तारण्याची योजना आखत आहे, जिथे फ्लेक्स-फ्यूएल वाहनांसाठी आधीच एक मोठी आणि प्रस्थापित बाजारपेठ आहे. सीईओ चितळे यांनी सांगितले की, कंपनी ब्राझीलमध्ये एक उत्पादन प्रकल्प देखील उभारणार आहे आणि तेथील गरजा पूर्ण करण्यासाठी हिरोकडे फ्लेक्स-फ्यूएल वाहनांचा एक मजबूत पोर्टफोलिओ आहे.
