AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या सरसंघचालक गोळवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का? – सचिन सावंत यांचा सवाल

सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या सरसंघचालक गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का? असा सवाल आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे.

सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या सरसंघचालक गोळवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का? - सचिन सावंत यांचा सवाल
sachin sawant
| Updated on: Nov 19, 2026 | 8:46 PM
Share

सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ यांच्या प्रकाशनानंतर मोठे वादळ निर्माण झाले आहे. सावरकरांनी ब्रिटीशांना माफी पत्र मागितल्याचा उल्लेख या आत्मचरित्रात असल्याने या पुस्तकाला शिंदे शिवसेनेने केला आहे. त्यात शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करत सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या संरसंघचालक गोळवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का? असा सवाल केला आहे.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशानंतर अनेक वाद निर्माण होत आहेत. या पुस्तकात काँग्रेसचा बचाव करण्यात आल्याचा आरोप आधी करण्यात आला होता. तसेच बोफोर्स घोटाळा आणि आणीबाणी संदर्भात उल्लेख केला नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर सावरकर यांच्या माफी मागण्याच्या पत्रांचा उल्लेखावरुन एकनाथ शिंदे यांची शिवसेना मैदानात उतरली होती. शिंदे सेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडताना बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा आक्षेप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतला होता.त्यावरुन जागोजागी आंदोलने सुरु आहेत. आता या संदर्भात शायना एनसी यांनी आपण केवळ मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला आहे असा बचाव केला आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यांना जर सोनियांचे पुस्तक फाडायचे होते तर बाळासाहेबांचा फोटो हे घेऊनच का गेले असा सवाल केला आहे. हे सर्वजण बाळासाहेबांचा फोटो फाडताना विकट हास्य करत होते असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

भाजप नेते अरुण शौरींचे पुस्तकही फाडणार का ?

यानंतर सायंकाळी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ए्क्स माध्यमावर एक पोस्ट केली आहे.या पोस्टमध्ये त्यांनी सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या सरसंघचालक गोळवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का? असा सवाल केला आहे. भाजप नेते अरुण शौरी यांनी The New icon– Savarkar and the Facts पुस्तकातही हेच सत्य सांगितले, त्यांचेही पुस्तक शिंदे सेना फाडणार का? सावरकरांनी दहावेळा माफीनामे दिल्याचे सावरकरांचे पणतू सात्यकी यांनीच पुणे न्यायालयात स्पष्ट केले. सावरकर यांची खरी अवहेलना उजव्या विचारधारेच्या लोकांकडूनच झाल्याचा दावा सचिन सावंत यांनी केला आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ