Feng Shui : घरात सतत भांडणं होतायेत? गृहकलह वाढलाय? मग या चुका टाळाच, फेंग शुईमध्ये काय सांगितलंय?
फेंग शुई हे देखील एक वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईला चिनी वास्तुशास्त्र म्हटलं जातं. आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर फेगं शुईमध्ये उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा आपल्या घरात काहीही कारण नसताना सतत भांडण होतात. त्यावर देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत.

फेंग शुई हे एक वास्तुशास्त्र आहे. या वास्तुशास्त्राचा उगम हा चीनमध्ये झाला. परंतु त्यानंतर या वास्तुशास्त्राचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला. आज जगातील असे अनेक देश आहेत, जिथे फेंग शुईमध्ये सांगण्यात आलेले उपाय केले जातात. फेंग शुईनुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे या नकारात्मक ऊर्जेवर नियंत्रण मिळवणं गरजेचं असतं, त्यासाठी फेंग शुईमध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. सकारात्मक उर्जेच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. आज आपण अशाच काही फेंग शुईमधील उपायांची माहिती जाणून घेणार आहोत. अनेकदा असं होतं की काहीही कारण नसताना आपल्या घरात सारखे भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही, त्यासाठी फेंग शुईमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत.
काटेरी वनस्पती – काटेरी वनस्पती फेंग शुई शास्त्रनुसार घरात कधीही कोणती काटेरी वनस्पती नसावी, याला अपवाद म्हणजे फक्त गुलाबाचं झाडं.जर तुमच्या घरात काटेरी वनस्पती असेल तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्याचा परिणाम हा पती-पत्नीच्या नात्यावर होतो. नात्यामध्ये कटुता निर्माण होते, त्यामुळे घरात कधीही काटेरी वनस्पती नसावी, असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे.
टाकाऊ वस्तू – फेंग शुई शास्त्रानुसार घरात कधीही टाकाऊ वस्तू साठवून ठेवू नये, जसं की भंगार सामान, रद्दी, खराब झालेल्या इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू यामुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तयार होते. ज्याचा परिणाम हा तुमच्या नात्यावर होतो. घरात सतत वाद होत राहतात. असे वाद टाळण्यासाठी घरातील सर्व टाकाऊ वस्तू घरातून बाहेर काढव्यात.
बंद घड्याळ – फेंग शुईमध्ये तसेच वास्तुशास्त्रामध्ये देखील घड्याळाला वेळेचं आणि प्रगतीचं प्रतिक माण्यात आलं आहे, त्यामुळे घरात कधीही बंद घड्याळ असू नये, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
