भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका ही भिवंडी व निजामपूर या दोन शहरांचा कारभार पाहते. या महापालिकेचे मुख्यालय भिवंडी येथे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार या ठिकाणी 7,09,665 इतकी लोकसंख्या होती. विणकरांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीचा व्यावसायिक आणि औद्योगिक विकास हे या महापालिकेचे महत्त्वाचे कार्य आहे. 2017 मध्ये भिवंडी महानगरपालिका निवडणूक पार पडली होती. यावेळी काँग्रेस,भाजप , शिवसेना, समाजवादी पार्टी, कोणार्क आघाडी आणि अपक्ष इतक्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले होते. काँग्रेस पक्षाचे महापालिकेत 47 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. या निवडणुकीत भाजपचे 19, शिवसेना 12, समाजवादी पार्टी 2, कोणार्क आघाडी 4 तर अपक्ष 6 उमेदवार निवडून आले होते. यामुळे भिवंडीच्या महापालिकेवर काँग्रेसचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर अशी आघाडी करून महापालिकाचा कारभार सुरु होता.
TMC KDMC NMMC UMC Election Results 2026 LIVE : दिघेंच्या ठाण्यात ‘भाई’च की ‘ठाकरे’? सत्तेचा ‘ठाणे’दार कोण? झटपट निकाल थोड्याच वेळात…
Thane Kalyan Bhiwandi Navi Mumbai Panvel Election Results 2026 LIVE Vote Counting and Updates in Marathi: ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरारसह एमएमआर क्षेत्रातील 8 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. प्रभागनिहाय विजयी उमेदवार, पक्षांची आघाडी-पिछाडी आणि कोण बाजी मारणार? पहा लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर.
- Namrata Patil
- Updated on: Jan 16, 2026
- 8:31 am
Bhiwandi : भाजपा उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल
भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. अशात भाजप उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत.
- sanjay patil
- Updated on: Dec 30, 2025
- 2:54 am