मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणूक 2026
मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) ही मुंबई जवळची एक महत्त्वाची महानगरपालिका आहे. जी मिरा आणि भाईंदर या जुळ्या शहरांच्या स्थानिक प्रशासनाची जबाबदारी सांभाळते. 1985 साली या महानगरपालिकेची स्थापना झाली. या महानगरपालिकेचे मुख्यालय भाईंदर येथे आहे. 1985 साली पाच ग्रामपंचायती एकत्र करून मिरा-भाईंदर नगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर 1990 साली रायगड-मुर्ढे, डोंगरी, उत्तन आणि वर्सोवा या आणखी चार ग्रामपंचायतींचा यात समावेश करण्यात आला. २०२२ मध्ये निवडणूक प्रक्रियेत विलंब झाल्याने प्रशासकीय कारणास्तव निवडून आलेल्या मंडळाची मुदत संपली, त्यानंतर राज्य सरकारने प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांची नियुक्ती केली. सध्या राज्य सरकारने नियुक्त केलेले प्रशासक (कमिश्नर) या महानगरपालिकेचे कामकाज पाहतात.
‘हिरव्या सापांना दूध पाजू नका, ते…’ मंत्री नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान, नेमकं काय म्हणाले?
Nitesh Rane : भाजपचे हिंदूत्ववादी नेते आणि मस्त्सविकास मंत्री नितेश राणे हे मिरा भाईंदर येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 23, 2025
- 11:00 pm