AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : पायलटच्या मदतीनेच अजितदादांचा घातपात; रोहित पवार यांचा सर्वात मोठा दावा

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाती निधनाबाबत गंभीर आरोप केले आहेत. हा अपघात नसून 'घातपात' असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. विमानात अवाजवी इंधन भरणे आणि पायलटची संशयास्पद भूमिका यावर त्यांनी बोट ठेवले. स्फोटाचे कारण अधिकचे इंधन असल्याचे सांगत, रोहित पवारांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : पायलटच्या मदतीनेच अजितदादांचा घातपात; रोहित पवार यांचा सर्वात मोठा दावा
रोहित पवार
| Updated on: Feb 18, 2026 | 2:19 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं. मुंबईहून सभेसाठी जात असताना त्यांचं विमान बारामती विमानतळाजवळ आल्यावर एका बाजूला कललं आणि खाली कोसळलं. त्यानंतर मोठ्ठा स्फोट होऊन आग लागली आणि त्यानंतर आणखीही स्फोट झाले. यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासह अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक तसेच फ्लाईट अटेंडंट पिंकी माली या पाच जणांचा मृत्यू झाला. अजित दादांचं अकस्मात जाणं हा संपूर्ण राज्यासाठी मोठा धक्का होता.

मात्र त्यांच्या विमानाचा अपघात नसून त्यामध्ये घातपात असू शकतो अशा शंका गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवारांच्या पक्षातील काही नेते , तसेच अजित पवार यांचे पुतणे रोहत पवार यांनीही घातपाताची शंका व्यक्त केली असून गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्राकर परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आजही मुंबईतील वाय बी चव्हाण सभागृहात आणखी एक पत्रकार परिषद घेत दादांच्य विमानाच घातपातच असावा असा दावा केला. पायलटच्या मदतीनेच अजितदादांचा घातपात झाला असा आरोपही रोहित पवार यांनी केला.

काय म्हणाले रोहित पवार ?

एखादा बॉल जर मातीत पडला तर तो कमी आदळतो, पण तो टणक रस्त्यावर पडला, जास्त आदळू टप्पे घेतो. आपण जर अपघात स्थळी पाहिलं तर अजित दादाचं जे विमान होते, कडक सरफेसवर पडलं, रनवेवर पडलं नव्हतं. तर एका साईडला पडलं होतं. त्यामुळे ते जोरात आदळलं. आता त्यांच्या विमानाचा स्फोट का झाला याबद्दल शंका घेतली जात, त्याचं मुख्य कारण, याबद्दल काही शंका व्यक्त करण्यात येत आहे. ती खरी ठरताना दिसत आहेत. अजित दादांच्या त्या विमानात जे फ्यूल टँक होते, ते अधिकचे होते. खरंतर विमानात टॉयलेटच्या बाजूला फ्यूल टँक असतात. त्याच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

आणि हे विमान जेव्हा मुंबईवरून बारामतीला गेलं तेव्हाच ते फ्यूल टँक भरले होते. पण मग फ्यूल टँक पूर्ण भरायची गरज नव्हती. बारामतीला दादांना सोडल्यावर विमान पुढे जाणार होतं, मग पुढे हैद्राबादला जाऊन विमानात इंध भरता आलं असतं ना. कोणी असं म्हणेल की महाराष्ट्रात इंधन स्वस्त असतं, म्हणून भरलं असेल तर मह इथल्यापेक्षा गुजरातमध्ये त्याहीपेक्षा स्वस्त होतं असा युक्तिवाद रोहित पवार यांनी केला. त्यामुळे विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय ? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. मुद्दाम पायलटचा वापर करून घातपात झाला असावा असा मोठा दावा रोहित यांनी केला. विमानात फ्यूएल जास्त असलं, तर स्फोट मोठा होईल ही शंका खरी ठरत आहे असंही ते म्हणाले.

Follow Us
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल