AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain Update : मुंबईत उधाणलेल्या समुद्रात अजब घडलं, अचानक समोर आलं गूढ जहाज, मध्ये नेमकं काय? सस्पेन्स वाढला!

हे जहाज किनाऱ्यापासून सुमारे 7-8 किलोमीटर अंतरावर समुद्रात आहे. हे जहाज नेमके कुठून आले, ते कोणत्या देशाचे आहे आणि त्यात काय सामान आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तटरक्षक दल आणि स्थानिक पोलीस मिळून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Mumbai Rain Update : मुंबईत उधाणलेल्या समुद्रात अजब घडलं, अचानक समोर आलं गूढ जहाज, मध्ये नेमकं काय? सस्पेन्स वाढला!
suspicious big ship found in mumbai ocean (सांकेतिक आणि संग्रहित फोटो)Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 07, 2026 | 11:02 PM
Share

Suspicious Ship Found In Mumbai Ocean : सध्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. यात मुंबईही सुटलेली नाही. मुंबई, उपनगरात अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. अजूनही लोकलची व्यवस्था सुरळीत झालेली नाही. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे लोकांना पाऊसधारांसोबतच लोकलच्या दिरंगाईचाही सामना करावा लागत आहेत. सध्याचे हवामान लक्षात घेता प्रशासनाने समुद्राजवळ बसण्यास मनाई केलेली आहे. तसेच समुद्रात जहाजांनाही जाऊ दिले जात नाहीये. मासेमारी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असतानाच आता एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या समुद्रात एकामागून एक एकूण दोन संशयित जहाजे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या समुद्रात एकामागून एक दोन संशयित जहाजे आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनोरी बीचनंतर आता मढच्या सिल्वर बीचजवळही एक संशयित जहाज दिसून आले आहे. पोलीस आणि तटरक्षक दलाची टीम तपासात गुंतलेली आहे. दोन दिवसांपूर्वी गोराईच्या मनोरी बीचवर एक संशयित जहाज सापडले होते. ते जहाज भारतीय तटरक्षक दलाने आपल्या ताब्यात आणि निगराणीत घेतले आहे. आता आज संध्याकाळी मालाडच्या मढ येथील सिल्वर बीचजवळ समुद्रात आणखी एक संशयित जहाज दिसले.

जहाजात नेमकं काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार हे जहाज किनाऱ्यापासून सुमारे 7-8 किलोमीटर अंतरावर समुद्रात आहे. हे जहाज नेमके कुठून आले, ते कोणत्या देशाचे आहे आणि त्यात काय सामान आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तटरक्षक दल आणि स्थानिक पोलीस मिळून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. हे जहाज मढपर्यंत कसे पोहोचले याचाही शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईच्या समुद्री भागात दिसलेले हे दुसरे संशयित जहाज आहे. दरम्यान, तटकरक्षक दलाने तसेच पोलिसांनी या जहाजाची तपासणी केल्यानंतर त्यात नेमके काय आहे, हे स्पष्ट होईल. गोराईच्या मनोरी बीचवर सापडेलेले अगोदरचे जहाज हे एक व्यापारी जहाज असल्याचे समोर आले होते. हे जहाज उधाणलेल्या समुद्रात भरकटले होते. आता नव्याने सापडलेल्या जहाजात नेमके काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ