Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेकीची गंभीर घटना घडली आहे. कारंजाच्या दिशेने जाणाऱ्या ८ ते १० वाहनांना लक्ष्य करण्यात आले. यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली. समृद्धी महामार्गावरील वाढत्या चोरी आणि दरोड्यांच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेकीची गंभीर घटना घडली आहे. कारंजाच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर अज्ञात व्यक्तींनी ८ ते १० वाहनांवर दगडफेक केली. या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये मोठी घबराट पसरली. अनेक वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्यावरच थांबवली, परिणामी समृद्धी महामार्गावरील वाहतूक जवळपास अर्धा ते एक तास ठप्प झाली होती.
वनोजा गावाजवळ असलेल्या टोल क्रमांक २०८ पासून कारंजाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच मंगरुळपीर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली. मात्र, या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावर चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, यामुळे जलद प्रवासासाठी तयार केलेला हा महामार्ग आता असुरक्षित बनत असल्याची तक्रार वाहनचालक करत आहेत.
Published on: Nov 27, 2026 01:48 PM
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....

