AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक

Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक

| Updated on: Nov 27, 2026 | 1:21 PM
Share

पुण्यातील गोळीबार घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. पुणे शहराची प्रतिमा मलिन होऊ नये आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीतून महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.

पुण्यात नुकत्याच घडलेल्या गोळीबार घटनेच्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने ॲक्शन मोडमध्ये येत महत्त्वाची पावले उचलली आहेत. या घटनेमुळे पुणे शहराची प्रतिमा डागाळली जाऊ नये, यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनासोबत एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

या बैठकीला पुणे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे पुण्यात घडलेल्या गोळीबार प्रकरणाचा आढावा घेणे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना आखणे हा आहे.

पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. पालकमंत्री सुनेत्रा पवार या बैठकीतून पोलिसांना काय सूचना देतात आणि पुढील कार्यवाहीसाठी काय धोरण ठरवले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

Published on: Nov 27, 2026 01:21 PM

Follow Us