AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

| Updated on: Jul 07, 2026 | 5:01 PM
Share

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात नुकतीच एक अनौपचारिक भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या भेटीनंतर शरद पवार गटाच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, या सर्व चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देत, NDAमध्ये जाण्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. पक्ष सक्षम विरोधक म्हणूनच आपली भूमिका कायम ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक (Delimitation Bill) पुन्हा मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी केंद्रातील NDAला अतिरिक्त खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासू शकते, अशी राजकीय चर्चा आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या ८ खासदारांचे राजकीय महत्त्व वाढल्याचे मानले जात आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या कथित भेटीकडे राजकीय विश्लेषक आणि सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या भेटीबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चांना या घडामोडींमुळे आणखी वेग आला आहे.

Published on: Jul 07, 2026 05:01 PM

Follow Us