AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ

Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ

| Updated on: Jul 07, 2026 | 5:27 PM
Share

विश्रांतीनंतर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. अचानक झालेल्या मुसळधार सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

विश्रांतीनंतर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. अचानक झालेल्या मुसळधार सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेक नागरिकांनी दुकाने, इमारती आणि आडोशांचा आसरा घेतला. काही वेळातच प्रमुख रस्त्यांच्या कडेला पाणी साचण्यास सुरुवात झाली, त्यामुळे वाहनचालकांनाही अडचणींचा सामना करावा लागला.

मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा वेग मंदावला असून, काही ठिकाणी किरकोळ वाहतूक कोंडीचीही परिस्थिती निर्माण झाली. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही पावसाची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून जाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Published on: Jul 07, 2026 05:27 PM

Follow Us
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!