Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. आज दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील किलोमीटर ७७/६०० या ठिकाणी किरकोळ दरड कोसळून दगड आणि माती रस्त्यावर आली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

घटनेनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून पुण्याकडे जाणारी वाहतूक तात्पुरती एकाच लेनवरून सुरू ठेवण्यात आली आहे. महामार्गावरील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.
दरम्यान, आयआरबी (IRB) कडून युद्धपातळीवर रस्त्यावर पडलेले दगड आणि माती हटवण्याचे काम सुरू असून, सुमारे एका तासात वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
सुदैवाने या दरड कोसळण्याच्या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडलेली नाही. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने प्रशासनाने वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
Published on: Jul 07, 2026 05:39 PM
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ