AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतची ती माहिती पूर्ण खोटी? थेट फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील सर्व माहिती…

अजित पवार प्रचार सभांसाठी बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अनेक दावे अजित पवार यांच्या निधनानंतर केली जात आहेत. त्यामध्येच आता तपास यंत्रणेकडून अत्यंत मोठा खुलासा या अपघाताबाबत करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतची ती माहिती पूर्ण खोटी? थेट फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील सर्व माहिती...
Ajit Pawar plane accident
| Updated on: Feb 18, 2026 | 2:08 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. धक्कादायक म्हणजे अजित पवार यांचा विमानाचा धावपट्टीच्या अगदी जवळ अपघात झाला. विमानातील एकही व्यक्ती वाचू शकला नाही. या विमान अपघाताचे धक्कादायक व्हिडीओ पुढे आली. हैराण करणारी बाब म्हणजे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर तब्बल तीन ते चार मोठी स्फोट झाली. अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अनेक दावे या अपघातासंदर्भात केली जात आहेत. थेट संशय व्यक्त केला जात आहे. अजित पवार आज आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वासच बसत नाहीये. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी काही तासात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आमदार रोहित पवार यांनी थेट माध्यमांसमोर येत अजित पवार यांच्या निधनाबद्दल काही दावे केले. थेट पवार कुटुंबियांकडूनही संशय व्यक्त करण्यात आला. आता या विमान अपघाताबद्दल मोठी माहिती मिळत आहे.

सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाला आहे आणि त्याला विदेशात पाठवण्यात आले. विमान अपघात नेमका कसा झाला हे ब्लॅक बॉक्सवरूनच कळेल आणि शेवटच्या क्षणी काय काय घडले हे ब्लॅक बॉक्सवरून कळणार. पण तो जळाल्याने माहिती मिळणार नाही, अशी एक चर्चा होती. आता त्यासंदर्भात मोठी अपडेट आली असून अजित पवार यांच्या विमान अपघाताचे मोठे कोडे सुटणार असल्याचे स्पष्ट आहे. 

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास एएआयबीकडून केला जात आहे. अपघातग्रस्त विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीपणे डाऊनलोड करण्यात आली. तपास संस्थेने याबद्दल स्पष्ट माहिती दिली. फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील डेटा पूर्णपणे डाऊनलोड करण्यात आला. यामुळे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नक्की कसा झाला, याबाबत सविस्तर माहिती पुढे येईल, शेवटच्या क्षणी काय घडले हे सर्वकाही रेकॉर्ड झाले आहे.

चर्चा आणि तर्कवितर्क टाळावेत चाैकशी प्रक्रिया व्यवस्थित होऊ द्या, असे आवाहनही तपास संथ्येकडून करण्यात आले. विमान अपघातानंतर दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर उष्णतेच्या संपर्कात आल्याने त्याचे नुकसान झाले होते. पण आता डिजिटल फ्लाइट रेकॉर्डर डेटा एएआयबीच्या प्रयोगशाळेत डाऊनलोड करण्यात आला. हे अत्यंत मोठे यश आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...