AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक घर होतं तेसुद्धा आलियाला विकलं, गाजलेले सिनेमा करूनही भाड्याच्या घरात राहतोय हा ज्येष्ठ अभिनेता, म्हणाला…

Bollywood Actor : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता भाड्याच्या घरात राहत असून नुकत्याच एका मुलाखतीत त्यानं याबद्दल सांगितलं आहे.

एक घर होतं तेसुद्धा आलियाला विकलं, गाजलेले सिनेमा करूनही भाड्याच्या घरात राहतोय हा ज्येष्ठ अभिनेता, म्हणाला...
| Updated on: Nov 21, 2026 | 8:39 PM
Share

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर गेल्या 42 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहेत. त्यांनी 540 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, पण ते आजही मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. अनुपम खेर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत, तर त्यांच्या पत्नी किरण खेर यादेखील एक ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार आहेत. या दोघांच्या एकूण संपत्तीची इंटरनेटवर नेहमीच चर्चा होते. अनेक रिपोर्टनुसार, केवळ अनुपम खेर यांची एकूण संपत्ती 400 ते 500 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. अशातच आता या चर्चांवर अनुपम खेर यांनी मौन सोडलं असून त्यांनी उपहासानं म्हटलं आहे की, त्या रकमेपैकी 10% रक्कमही त्यांच्या मालकीची नाही.

आलिया भट्टला विकलं घर

अनुपम खेर म्हणाले की, घर विकत घेण्याऐवजी भाड्यानं राहणं त्यांना अधिक पसंत आहे, कारण त्यामुळे त्यांना मानसिक शांती मिळते. ‘द अनफिल्टर्ड अवर’ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम यांनी भाड्याच्या घरात राहण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल भाष्य केलं. अनुपम खेर म्हणाले की, ‘ज्या दिवशी मी भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला, त्या दिवशी मी स्वतःला मुक्त केलं. मी हा निर्णय 10 वर्षांपूर्वी घेतला होता. मला मालमत्तेशी संबंधित कोणताही त्रास नाही. मी फक्त माझ्या आईसाठी शिमलामध्ये घर विकत घेतलं. मी आणि माझा भाऊ दोघेही भाड्याच्या घरात राहतो आणि आम्ही आनंदी आहोत. जेव्हा माझं स्वतःचं घर होतं, तेव्हा मी ते आलिया भट्टला विकलं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या घरात राहायला गेलो. साधारण त्याच वेळी किरण खासदार झाल्या, त्यामुळे त्या चंदीगडला राहायला गेल्या.’

‘तुम्हाला असं वाटतं की, तुम्ही जगातील सर्वात महान व्यक्ती आहात. तुमच्यावर कोणताही ताण नसतो. याआधी माझं स्वतःचं घर होतं, ते मी आलिया भट्टला विकलं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या घरात राहायला गेलो. त्याच काळात किरण खासदार झाल्यामुळे ती चंदीगडला गेली. मी घर शोधत होतो आणि तेव्हा मला जाणवलं की, आपण भाड्याच्या घरातही राहू शकतो. लोकांच्या मनात माझी प्रतिमा खूप श्रीमंत व्यक्ती अशी आहे. तुम्ही गुगलवर माझी संपत्ती किती आहे हे शोधलं, तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कधीकधी तर या वेबसाइट्सवर खटला दाखल करावा, असं मला वाटतं. माझ्याकडे ४०० ते ५०० कोटी रुपयांच्या १० टक्के संपत्तीही नाही. माझे मित्र इंटरनेटवर हे वाचतात आणि गंमतीने मला या पैशांमधून काही रक्कम देण्यास सांगतात.’

‘मला आजही चांगलं जेवण खाण्यासाठी उत्तम रेस्टॉरंटमध्ये जायला आवडतं. मी आजही आरामदायी प्रवास करतो आणि सर्वोत्तम हॉटेल्समध्ये राहतो. असं नाही की मी एखाद्या झोपडीत राहतो. मला आरामदायी आयुष्य जगायला आवडतं. पण या गोष्टींना काही अंतच नाही.’ असंही अनुपम खेर म्हणाले.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...