Amit Satam | मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया; अमित साटम म्हणाले, आम्हाला त्यांचा सार्थ…
येणाऱ्या काळात मातृशक्तीच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचार मुक्त होणार, मुंबई शहर खड्डे मुक्त होणार, मुंबईची तुंबई होणार नाही. मुंबईचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, नरेंद्र मोदींच्या व्हिजननुसार काम करण्याकरिता आपली मातृशक्ती सज्ज होणार आहे, असा विश्वास साटम यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई महापालिकेतील महापौरपद महिलांसाठी राखीव झालं आहे. मुंबईसह इतर अनेक महापालिकांवर महिला राज असणार आहे. यावर भाजप नेते अमित साटम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, येणाऱ्या काळात मुंबई शहराचं नेतृत्व एक माता भगिनी करणार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि येणाऱ्या काळात मातृशक्तीच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचार मुक्त होणार, मुंबई शहर खड्डे मुक्त होणार, मुंबईची तुंबई होणार नाही. मुंबईचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, नरेंद्र मोदींच्या व्हिजननुसार काम करण्याकरिता आपली मातृशक्ती सज्ज होणार आहे, असा विश्वास साटम यांनी व्यक्त केला आहे. राज्यात चंद्रपूर, जळगाव, अकोला, अहिल्यानगर, जालना, लातूर, मुंबई, नागपूर, पुणे, धुळे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, मालेगाव, नाशिक, नांदेड-वाघाळा, छत्रपती संभाजी नगर आदी 16 महापालिकांमध्ये महिला महापौर बसणार आहे. म्हणजे राज्यातील 16 शहरांचा गाडा हाकणार आहे.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट

